समाजाच्या विकासासाठी शिक्षण ,आर्थिक सुबत्ता व समाजनिष्ठता हे तीन मूलमंत्र डॉ. जयाजीनाथ
राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
पाटोदा ; पाटोदा डवरी समाजाची बैठक संपन्न
जयाजीनाथ साहेब तसेच महासंघाचे राज्य अध्यक्ष माननीय दिगंबर डवरी महाराष्ट्र संपर्क प्रमुख माननीय प्रकाश आहेरकर राज्य सचिव माननीय योगेश बर्वे मराठवाडा अध्यक्ष सोमनाथ धायडे यांनी औरंगाबाद येथे विभागीय पातळीवर मराठवाड्यातील नाथपंथी समाज बांधवांची बैठक आयोजित केली होती
या बैठकीसाठी बीड जिल्ह्याचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण कार्याध्यक्ष , संजय सावंत हरिभाऊ भराडी दत्ता शिराळकर भैरवनाथ शिंदे गणेश शिंदे रंगनाथ पैठणकर हे प्रामुख्याने डॉक्टर पैठणकर यांच्या व ह. भ. प. भरत महाराज जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे बैठकीस उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जयाजी नाथ साहेब व इतर पदाधिकाऱ्यांचे बीड जिल्ह्याच्या वतीने हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जयाजीनाथ साहेब यांनी मार्गदर्शन करताना अतिशय मोलाचा सल्ला दिला
समाजातील मुलांना शिक्षण द्या व आपली आर्थिक बाजू सक्षम करा तसेच समाज एकसंघ व एकनिष्ठ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला तरच समाज मोठा होईल यासाठी समाज बांधवांचा सर्वे करा त्यांचे प्रश्न सोडवा तरच समाजाचा विकास होईल असे सांगितले याप्रसंगी बीड जिल्ह्याचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण साहेब यांनी बीड येथे महासंघ स्थापन केल्यापासून आज पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा राष्ट्रीय अध्यक्ष यांना दिला
तर बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय सावंत सर यांनी समाज विकास करण्यासाठी येणाऱ्या अडचणी राष्ट्रीय अध्यक्ष न सांगून त्यांचे मार्गदर्शन घेतले तसेच रंगनाथ पैठणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी माननीय जयाजीनाथ साहेब यांच्याकडून काही गोष्टीचे मार्गदर्शन घेतले.शेवटी माननीय गणेश शिंदे सर यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.