झरे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप .
ज्ञान हेच माणसाचं खर सौंदर्य, -आर. एस. चोपडे.
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय झरे.या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शैक्षणिक वर्ष 2022-23 या कालावधीत मौजे विरळी या ठिकाणी दिनांक 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत संपन्न झाले.
1 मार्च रोजी या शिबिराचा समारोप झाला. या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे विद्यमान चेअरमन, मा. आर.एस. चोपडे, तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे जेष्ठ सल्लागार,एस. के. कदम हे उपस्थित होते. नेतृत्व करण्यासाठी चांगल्या विचारांची तसेच चांगली शिकलेली माणसं असणं गरजेचं असतं. तेच चांगले विचार देण्याचं काम या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमांतून होत असते. म्हणून ही शिबीरं महत्वाची आहेत. त्याचबरोबर शिक्षण हे माणसाच्या आयुष्यात गुणात्मक वाढ करते.
व्यक्तीचं खरं सौंदर्य म्हणजे त्याचं ज्ञान असते.आणि हे ज्ञान आणि चांगले विचार देण्याचं काम महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून चालणारे वेगवेगळे उपक्रम करत असतात. असे मा.आर.एस. चोपडे समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यानंतर विरळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. नीलमताई घुटुकडे या म्हणाल्या की गेली सात दिवस या शिबिराच्या माध्यमातून या झरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं आहे. हे काम करत असताना त्यांच्यातील बंधुभाव व एकता या दोन गोष्टी मला खूप भावल्या. त्यानंतर जेष्ठ नागरिक बापू तात्या नलावडे बोलताना म्हणाले की कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे एक वेगळी संकल्पना माझ्या मनात होती. पण झरे महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तेबरोबरच नम्रता, प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता. हे सर्व गुण अंगीकारत असल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. ए. खिलारी यांनी केले, प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. डी. खांडेकर यांनी केले. आभार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर. एच. पाटील यांनी मानले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री एस.के.कदम उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक यु.सी . नलवडे, मुख्याध्यापक के. के. माने ,वेळीच्या लोकनियुक्त सरपंच नीलमताई घुटुकडे ,माजी सरपंच प्रशांत गोरड ,बापूराव नलवडे आनंदा अटपडकर, मल्हारी भंडारे, अंजना सकट, शिवाजी नलवडे बी.जी. नलवडे, रामहरी घुटूकडे, शिवाजी गोरड, हणमंत घुटूकडे, शिवाजी घुटुकडे सर्व ग्रामस्थ तसेच महाविद्यालयाचे प्रा.एन. डी. पाटील, प्रा. एस.डी. मुलाणी , प्रा.एम. एस. शिंगाडे, एस. के. वाघमोडे, प्रा.सौ. माया माने, प्रा. आर. एच.चौगुले, प्रा डी. एस. देवकुळे, प्रा. सौ.आर. व्ही. काळेल, जे.जे.फकीर एम. पी. नरळे, व श्री जानुबाई विद्यालायचा सर्व स्टाफ. एन. एस. एस. चे स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.