अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील जवखेडा मंडळात शनिवारी सायंकाळी उशिरा झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात जवखेडा मंडळातील वरुळ,तऱ्हाडी, भटाने,तऱ्हाड कसबे,अंतुर्ली, भामपूर,लोंढरे,आदी भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यास सुरवात झाली.आणि विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाळा सुरवात झाली.वादळी वाऱ्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. गहू,हरभरा,मका,केळी टमाटे,आदी शेती पिकांचे नुकसान झाले आहे.वादळ आणि पावसामुळे ठीक ठिकाणी काढणीला आलेले गहू,हरभरा मका,पुर्णतः जमीनदोस्त झाली आहेत.
तसेच केळी झाडे कोलमडून पडली आहेत.त्याला फटका बसला आहे. काही ठिकाणी कमकुवत झाडांच्या फांद्या देखील तुटून रस्त्यावर पडल्या आहे.