शिवसेना चाळीसगाव तालुका प्रमुख पदी राहुल पाटील यांची निवड
वाघडू ता चाळीसगाव
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,शिवसेना सचिव संजय मोरे साहेब, पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या आदेशानुसार पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील,जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,शिवसेनेचे नेते मा.उमेश पप्पूदादा गुंजाळ यांच्या उपस्थितीत वाघडु गावाचे उपसरपंच मा.राहुल राजेंद्र पाटील यांची शिवसेनेच्या चाळीसगाव तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली
राहुल पाटील सारख्या ग्रामीण भागातील तरूणाला कुठलेही राजकीय पाठबळ नसतांना फक्त कामाच्या व तालुक्यात असलेल्या संपर्काच्या जोरावर महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असलेल्या शिवसेना सारख्या हिंदुत्ववादी पक्षाच्या तालुका प्रमुख पदावर निवड झाल्याने ग्रामीण भागात शिवसेना युवासेना वाढीसाठी नक्कीच बळ मिळेल
अखेर सर्वसामान्य कार्यकर्ताला न्याय मिळाला