“
“सद्गुरु श्री श्री कारखान्यामध्ये सन 2022 – 23 ऊस गळीत हंगामाचा समारोप समारंभ”
पिलीव प्रतिनिधी( विश्वजीत गोरड):
सांगली,सातारा,सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या पदस्पर्शाने व आशीर्वादाने आणि चेअरमन एन शेषागिरी राव सर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली गेली 11 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने व बळीराजाच्या हिताच्या दृष्टीने व समाजातील सर्व घटकांच्या, सर्वसामान्यांच्या हृदयात व मनात सन्मानाचे स्थान निर्माण केलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या अकराव्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाचे आयोजन एच आर एॅड एडमिन मॅनेजर सचिन खटके व केन मॅनेजर सुनील सावंत यांनी केले होते.
सदर कार्यक्रमास संचालक श्री मोहन बागल व सौ वंदना बागल यांचे हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा करून सुरुवात केली. सर्व मान्यवरांचे आगमन व्यासपीठावरती झाले नंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंढरपूर नगरीच्या जवळ असलेल्या गादेगावच्या नवनियुक्त व लोकनियुक्त सरपंच सौ वंदना बागल यांच्या शुभहस्ते व चेअरमन एन शेषागिरी राव सर, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालक मोहन बागल, जनरल मॅनेजर रामाराव, रघुनंदन रेड्डी ,संदीप पाटील,नागेश पवार,पवार, डिस्टिलरी मॅनेजर प्रकाश भोसले,माळशिरस नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन वावरे ,शेती अधिकारी दत्ता क्षीरसागर, सुरक्षा अधिकारी भूसणर, युवराज भंडारे,पत्रकार विश्वजीत गोरड व सर्व खाते प्रमुख, अधिकारी ,पदाधिकारी, कर्मचारी व वाहन,मालक, चालक, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व सभेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली .
प्रास्ताविकामध्ये केन मॅनेजर सुनील सावंत यांनी कारखान्याची सर्व सविस्तरपणे माहिती कथन केली. व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी चालू वर्षी आपल्या अपेक्षेप्रमाणे काही अडचणींमुळे ऊस गाळप मोठ्या प्रमाणात जरी झाले नसले तरीसुद्धा चालू वर्षीच्या काळामध्ये आपण निश्चित गाळपामध्ये सर्वांच्या पुढे असणार आहोत .त्यासाठी सर्वांनी सज्ज रहा व येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने आमचे सर्व संचालक मंडळ येणाऱ्या संकटावरती मात करून ऊस गाळपाचे उच्चांकी ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही .
अशी ग्वाही दिली. त्यानंतर माननीय चेअरमन शेषागिरी राव सर यांनी आपल्या आभार समारंभाच्या वक्तव्यातून सर्वांचे अभिनंदन व कौतुक करून सद्गुरु श्री श्री रविशंकर जी तथा गुरुजी यांनी दिलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करून आपले ध्येय गाठण्यास कटिबद्ध राहण्याचा सल्ला देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले .सूत्रसंचालन पत्रकार रघुनाथ देवकर यांनी केले.