धनगर समाजासह वंचिताचा विकास करणारच…. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजासाठी विविध योजनेसाठी निधी प्राप्त करून दिल्या बाबत धनगर स
माजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला.
धनगर समाजासह राज्यातील सर्व अपेक्षित वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार वचनबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना अपेक्षित वंचित वर्गापर्यंत पोहोचवून दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योद्याचा विचार प्रत्यक्षात आणू असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
धनगर समाजासाठी राज्य अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने संघटनेतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजप प्रदेश कार्यालययात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकर ,माजी आमदार रामराव वडकुते, माजी मंत्री कृपाशंकर सिंग आदी यावेळेला उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की धनगर समाजासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजना अभ्यास करूनच तयार करण्यात आल्या आहेत .मेंढपाळांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शेळी व मेंढी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व योजना साठी जाहीर केलेला निधी उपलब्ध होणार आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याकडे लक्ष न देता या सर्व योजना समाजातील गरजू घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी धनगर समाजाच्या नेत्यांची आहे
पंतप्रधान आवास योजनेतून किमान 25000 घरे धनगर समाजातील लोकांसाठी बांधली जातील, आदिवासी पाडे ,धनगर वस्त्या ,बंजारा तांडे यांच्यासह रस्ते बांधण्या ची योजना सरकारने आखली आहे
भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजासाठी च्या योजना गरजू वर्गापर्यंत पोहोचविल्या जातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या प्रचारासाठी अखंड मेहनत घेत आहेत बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या मागे पक्षाची ताकद उभी केली आहे या माध्यमातून वंचितांच्या साठीच्या योजना गरजूपर्यंत पोहोचवल्या जातील असा विश्वास श्री फडणवीस यांनी व्यक्त केला
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले की रानोमाळ भटकणाऱ्या व विकासापासून वंचित राहिलेल्या मेंढपाळ समाजासाठी देवेंद्र फडणीस यांनी जशा योजना आणल्या आहेत. तशा आजवर कधीही आणल्या गेल्या नव्हत्या म्हणून समाजातर्फे आम्ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. गाव गाड्यातील सर्व अपेक्षित वंचित घटकाबद्दल फडणवीस हे संवेदनशील असल्याने त्यांनी या योजना तयार केल्या आहेत.
यावेळी धनगर समाजाच्या परंपरेप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा घोंगडी फेटा आणि कुराड देऊन सत्कार करण्यात आला.