आरोग्यमंत्री मा.ना.प्रा.डॉ.श्री. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना. प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत ग्रामीण रुग्णालय- माढा येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराचा शुभारंभ सांगोला तालुक्याचे आमदार, शहाजी (बापू) पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य- सोलापूर. हे असून या कार्यक्रमासाठी जिल्हा शस्त्र चिकित्सालय, सोलापूर- श्री.धनंजय पाटील, तहसीलदार ,माढा- श्री.राजेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर- डॉ.सोनिया बागडे ,गट विकास अधिकारी ,माढा- श्री. संताजी पाटील, वैद्यकीय अधिकारी ,माढा-डॉ.नंदकुमार घोळवे , स्विय सहाय्यक आरोग्य मंत्री-श्री.प्रवीण लटके ,तालुका वैद्यकीय अधिकारी, माढा- शिवाजी थोरात. सहाय्यक पोलीस निरीक्षक, माढा- श्री.शाम बुवा उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये बचत गटातील सर्व महिलांचे आरोग्य तपासणी, लहान मुलांची तज्ञ डॉक्टर कडून तपासणी, हृदयरोग दमा मधुमेह उच्च रक्तदाब ईसीजी तपासणी डोळे तपासणी चष्मे वाटप व मोतीबिंदू तपासणी हाडांचे आजार , व एक्स-रे तपासणी, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी, कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी शासनाचे आजार निदान उपचार तज्ञ डॉक्टर मार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आव्हान माननीय. प्रा.श्री.शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.