अपेक्षेपेक्षा जास्त पगार तरीही पेन्शनसाठी एल्गार……..शेतकरी कर्जाने झाले बेजार
शेतकरी कर्जाने झाले बेजार
त-हाडी: संपूर्ण महाराष्ट्रमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी काम बंद आंदोलन करून प्रशासकीय कार्यालयावर मोर्चे काढले आहेत. मात्र शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर झालेल्या कर्जामुळे त्यांने कधी काम बंद आंदोलन करूनही कधी भाव मिळाला नाही.
गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार गगनाला भिडण्यासारखे झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी कर्मचारी सुखी आणि समृद्ध झाला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा आलिशान बंगला, कार देखील आहे. कर्मचारी सरकारी जरी असला तरी भरमसाठ पगारामुळे मुले खाजगी इंग्लिश मीडियमला शिकतात. महाराष्ट्रातील प्रत्येक आहेत. शहरामध्ये सर्वात जास्त ह्या प्लॉटिंग जमिनी सरकारी कर्मचान्यांच्या असलेले दिसून येते. सरकारी कर्मचारी हा लग्न करताना बायको देखील सरकारी पगाराचीच बघतो. त्यामुळे देखील डबल पगारी असणारे कुटुंब जास्त पाहायला मिळतात.
महिन्याकाठी लाख रुपये घरात येत असताना देखील काम बंद ठेवून पेन्शनसाठी एल्गार कशासाठी? आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकाही सरकारी कर्मचाऱ्यांने पगार कमी असल्याचे कारणाने आत्महत्या केली
असल्याचे दिसून आले नाही. महाराष्ट्रात वर्षाला कितीतरी शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत
खते, बी-बियाणे महागली मात्र शेतमालाचे दर वाढले नाहीत. पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढलेला आहे. पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या • शाळेचे शिक्षण घेताना सुद्धा काटकसर करावी लागते. वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्याला महिन्याकाठी दहा हजार रुपये कमवताना देखील रखरखत्या उन्हामध्ये कष्टाचा घाम गाळावा लागतो. तरी देखील दहा हजार रुपये मिळतील का नाही याची शाश्वता
नसते. मात्र सरकारने नेहमीच निराश केलेला शेतकऱ्याने कधीही काम बंद ठेवून आंदोलन केले नाही, कधीच शेती पिकवणे बंद केले नाही. या शेतकऱ्यांना कोणतेही वेतन नाही, कोणतीही पेन्शन नाही. मात्र, त्रासहा कायम त्यांच्या नशिवीच राहिले.
५० हजार रुपयांच्या पुढे पगार असताना पेन्शनची गरज पडतेच कशाला. चांगले जीवन जगायला दहा हजार रुपये देखील पुरेसे होतात हे येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. अशी चर्चा जनतेतून होत आहे.
५० हजार पगार आणि बायको नोकरीला असेल तर घरामध्ये लाख रुपये येतात तरी देखील आज रखरखत्या उन्हामध्ये पेन्शन मिळावे म्हणून काम बंद आंदोलन करून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र ऊन, वारे, पाऊस थंडीचा विचार न करणारा आमचा शेतकरी वेतन द्या, पेन्शन द्या, म्हणून कधीही रडला नाही..