आम. गोपीचंद पडळकर यांनी ग्रामपंचायत सदस्याच्या कानशिलात लावल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना काँग्रेस रासप यांच्यात काटे की टक्कर आहे.
सकाळपासूनच मतदार केंद्रावर रांगा लागल्या होत्या सकाळी आठच्या दरम्याने मतदानाला सुरुवात झाली दुपारी बारा वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले होते. पण यापूर्वी अकरा वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली व यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना कानशिलात लगावली.
यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शांततेची आव्हान केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या सह मोठा फौज फाटा बंदोबस्त त्यांनी करण्यात आला होता.