विभूतवाडीत पाणीपुरवठ्यासाठी आता मिळणार 24 तास लाईट _सरपंच चंद्रकांत पावणे
आम्.गोपीचंद पडळकर व माजी समाजकल्याण सभापती यांचे मार्गदरशनाखाली प्रशासकीय मंजुरी मिळाली
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपासाठी 24 तास लाईट मिळणार असल्याची माहिती सरपंच चंद्रकांत पावणे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील काही महिन्यापूर्वी सरपंच चंद्रकांत पावणे यांनी शाखा अभियंता उपविभाग खरसुंडी यांच्याकडे 24 तास विद्युत पुरवठा मिळण्यासाठी मागणी केली होती.
त्यानंतर शाखा अभियंता उपविभाग खरसुंडी यांनी तसा प्रस्ताव पुढील कार्यालयाकडे पाठविला होता त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास लाईट मिळणार असून लवकरच काम सुरू होईल अशी माहिती चंद्रकांत पावणे यांनी दिली
या कामासाठी आमदार गोपीचंद पडळकर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सरपंच पावणे यांनी सांगितले.
त्यामुळे भविष्यामध्ये नागरिकांना दिवसा पिण्याचे पाणी मिळणार आहे. सध्या अनेक वेळा रात्रीचे पाणी नागरिकांना मिळत होते. तो नागरिकांचा त्रास कमी होऊन त्यांना पुढील काळामध्ये दिवसा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. लवकरच सिंगल फेज चे काम सुरू होईल अशी माहिती सरपंच पावणे यांनी दिली.