विभूतवाडी मध्ये शेळ्यांना विषबाधा.. चार शेळ्यांचा मृत्यू
विभुतवाडी ता. आटपाडी येथील पवारवस्ती येथे मुरलीधर विठोबा पवार यांच्या चार शेळ्या विष बाधाने मृत्यू झाल्या असून यामध्ये त्यांचे जवळपास 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मुरलीधर पवार हे दररोजच्या प्रमाणे आजही शेळ्या सोडून स्वतःच्या रानात चारण्यासाठी गेले होते. काही वेळानंतर शेळ्या इकडे तिकडे पळू लागल्या होत्या, काय झाले म्हणून मुरलीधर पवार घाबरले होते. बघता बघता काही क्षणातच चारी गाभण शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यामध्ये त्यांचे जवळपास 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे..
गावकामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी करून पंचनामे केले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत शेळ्याचे पोस्टमार्टम केले आहे.
याबाबत तहसीलदार बी.एस .माने यांना संपर्क साधला असता त्यांनी तातडीने गाव कामगार तलाठी संतोष पवार यांना आदेश दिले . तलाठी संतोष पवार यांनी लगेचच पंचनामे केले तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमार्टम केले.