वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा…
स्वाभिमान दिनानिमित्त वह्या व पेन वाटप कार्यक्रम संपन्न…
नांद्रे
दि. १४ मे २०२३
वंचित,पीडित आणि दुर्लक्षित घटकांचा बुलंद आवाज,महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील अग्रगण्य नेत्यांमधील एक अभ्यासू,विद्वान नेतृत्व,बहुजन हृदयसम्राट श्रद्धेय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिन हा संपूर्ण भारतभर “स्वाभिमान दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वाढदिवसाचे अवचित साधून मिरज तालुक्यातील नांद्रे गावात बाहेरुन परप्रांतातून काबाड कष्ट करण्यासाठी आलेले, नांद्रे गावात गायरान वस्तीत आपल्या कुटुंबीयांसह राहत असणारे श्रमिक कष्टकरी
कामगारांच्या गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले जेणेकरून कामगार बंधू – भगीणींच्या मुलां मुलींना शिक्षण आवड व गोडी लागावी तसेच ते मुले चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहावे. शिक्षणाच्या वाटेवर जे गेले ते आयुष्याचा वाटेत यशस्वी झालेत. शिक्षणामुळेच समाजाची उन्नती होतं आहे. म्हणून कष्टकरी बांधकाम कामगारांच्या गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या मार्फत, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांचे उत्तम नियोजन वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ पदाधिकारी तसेच आदरणीय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचे विश्वासू निष्ठावंत जेष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते “आयु.किशोरजी आढाव साहेब” यांनी केले, यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन व सम्यक युथ फाऊंडेशन यांच्या वतीने सहकार्य करण्यात आले . श्रद्धेय आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवस मोठ्या आनंदात उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ जिल्हा सदस्य किशोर आढाव, सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे,मिरज तालुका उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश माने, सम्यक युथ फाऊंडेशनचे अतिश बल्लाळ, प्रशिक काकडे, अमित ढाले, विजय सद्गुने, प्रसाद यादव यांच्या बरोबर पदाधिकारी कार्यकर्ते, सदस्य आणि कामगार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.