शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत आणि सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थित रहा— शेख निजाम
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष व केंद्रीय राज्यसत्तेकडून केंद्रीय तपास यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून शिवसेना पक्षातील गद्दारांना सोबत घेऊन अनैतिक सरकार स्थापन केले माननीय सर्वोच्च न्यायालय मध्ये सदर प्रकरणाची सुनावणी होऊन त्यामध्ये निर्णय पारित झालेला आहे. सदरील निर्णयामध्ये सदरील अनैतिक स्थापन झालेल्या सरकारच्या स्थापनेमध्ये घटनात्मक पदावर बसलेल्या लोकांनी आपल्या कर्तव्याचे वहन योग्य केले नसल्याचे ताशेरे मा. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केलेले आहे.
शिवसेना पक्ष व माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवण्यासाठी सत्ता धारी पक्ष शिवसेना पक्षातील गद्दार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोठमोठ्या वल्गना करीत आहे वास्तविक पाहता सर्वसामान्य जनता व शेतकरी ही महागाई, रोजगार, गारपीट व अवकाळी पाऊस इत्यादी प्रश्नांमुळे अगोदरच हैराण असून त्यात केंद्रीय भाजप सत्ता व महाराष्ट्रातील मूळ प्रश्नांना बगल देऊ धार्मिकतेचे वातावरण निर्माण करून सामाजिक ध्रुवीकरण करीत आहे याच पार्श्वभूमीवर प्रबोधनकार ठाकरे यांच्या शिकवणीनुसार व बाळासाहेब ठाकरे व माननीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भाजप व जातीयवादी पक्षांनी व गद्दारांनी निर्माण केलेला संभ्रम दूर करून सर्वसामान्य जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जोडण्याचे काम महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने करण्यात येत आहे.