लग्नसराईची धूमधाम अन् वऱ्हाडी मंडळी घामाघूम
शिरपूर/ :- सध्या लग्नसराईचा अगदी मोठ्याप्रमाणात धुमधडाका सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र सध्या वाढत्या तापमानामुळे व-हाडी मंडळींना चांगलाच उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे लग्नसराईची धूमधाम अन् वर्हाडी मंडळी होतीया घामाघूम असे चित्र सध्या दिसत आहे.
उन्हाचा पारा जोमाने वाढत असून,सुर्य अक्षरशः दुपारी अकरा ते चार यावेळेत आग ओकत आहे.बरेच लग्न मुहूर्त हे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंतचेच आसतात.आपसुकच सध्या यादरम्याने मोठा उकाडा असतो. उन्हातान्हातून लग्न समारंभासाठी आलेली वन्हाडी मंडळी ही घामाघूम होत असल्याचे दिसत आहे.
सध्या लग्नतिथी खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे एप्रिल महिन्यात व मे महिन्यात काही लग्न तिथी असून लग्नसराईला चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे.सध्या साधारण एका गावात दिवसाकाठी एकदोन तर विवाह होत आहेत.या विवाहासाठी आलेल्या वर्हाडी मंडळींना पाणी देण्याचीच लग्नकर्त्या मंडळींची मोठी लगबग दिसून येत आहे.याकरीता लग्नकर्त्या मंडळींना विकतचे शुद्ध व थंड पाणी घ्यावे लागत आहे.
लग्नतिथी असल्याने वधू-वराकडील मंडळी वधू-वरांसाठी व लग्न समारंभासाठी बाजारपेठेत कपडे, भांडे व सोने व इतर साहित्य खरेदी करण्याकरीता मोठी गर्दी करीत असल्याने कपड्याचे,भांड्याचे व सोन्याची दुकाने हाऊसफुल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.मात्र, वाढत्या तापमानामुळे वऱ्हाडी मंडळीची मोठी दमछाक देखील होत असल्याचे दिसत आहे
(चौकट ओळी :-डीजे ने हरपला बँडबाजा –
लग्नसराई म्हटलं की जिथ तिथं सनई,चौघडा त्यानंतर बँडबाजा, तडमताशा,ढोलीबाजा आदी वाद्यांची धूम आसत परंतु सध्या हे काळाच्या ओघात मागे पडून आता या सर्व वाद्यावर कर्कश अश्या आवाजाच्या डीजेने कुरघोडी केल्याचे चित्र दिसत आहे.जिथे डीजे नसतो तिथे मात्र ढोलीबाजा आपले स्थान टिकवून आहे.परंतु ढोलीबाजापेक्षाही डीजेच्याच तालावर नाचण्यासाठी आजची तरुण पिढी जास्त भर देत असल्याचे चित्र आहे.)
पूर्वी हळद लावल्यानंतर ते वऱ्हाडाच्या जाण्यापर्यंत सनईचा सूर ऐकावयास मिळत होता. त्यानंतर बँडने ती जागा घेतली. त्यानंतर ढोलीबाजाने त्याची जागा घेतली आणि आता ती जागा पुर्णतः डीजेनेच हस्तगत केली आहे.