प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रम
सामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
गंगाखेड/ प्रतिनिधी
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेशी निगडित असलेल्या विषमुक्त शेती अभियानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर त्यांचा मंगळवार 20 ऑगस्ट रोजी राजेश्वर फंक्शन हॉल गंगाखेड या ठिकाणी साडेअकरा वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
पिक विमा चळवळ, शेतकरी आत्महत्या, गोपालनाचे महत्त्व, सेंद्रिय शेती, स्वय रोजगार, महिला सक्षमीकरण या विषयावर मागील दहा वर्षापासून सखाराम बोबडे पडेगावकर व पत्नी अल्का बोबडे हे दांपत्य सक्रिय आहे. त्यांच्या या कार्याची घेत हार्वेस्ट सक्सेस अकडमी, माय लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या केंद्र शासनमान्य संस्थांच्या वतीने DTC (जिल्हा समन्वयक) हे मानांकन देऊन सार्वजनिक कार्यक्रमात सपत्नीक मान सन्मान केला जात आहे.
या सत्कार सोहळ्यास राष्ट्रीय समूह समन्वयक NTC अक्षय गोरठकर (संभाजीनगर,) विभागीय समन्वयक RTC स्वाती किशोर वागले (संभाजीनगर) ह्या उपस्थित राहत शेतकरी युवकांना मार्गदर्शन करणार आहेत .तरी या सत्कार समारंभास जिल्ह्यातील युवक , शेतकरी, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.