अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
त-हाडी – प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अभानपुर येथे श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव दिनांक २६ ऑगस्ट २०२४ गोकुळ अष्टमी निमित्ताने वार-सोमवार रोजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवात सकाळी सात वाजता महापूजेचे मान्यवरांच्या य हस्ते श्री गोसावी बाबाची महापूजा होणार आहे. तसेच यात्रेनिमित्त २६ ऑगस्ट२०२४ रोजी. विद्या शिवानी अंमळनेरकर याचा लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्या जाहीर तमाशा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आज दुपारी चार वाजता तगतरावाची महापूजा धार्मिक विधी होईल. ढोल ताशांच्या गजरात यावेळी मिरवणूक काढण्यात येईल .
श्री गोसावी बाबा नवसाला पावणारी देव असून भाविकांची श्रद्धास्थान आहे यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या उत्साहाने नवस फेडण्यासाठी येत असतात .श्री गोसावी बाबा यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, नारळ, फुलहार तसेच खाद्यपदार्थ हॉटेल्स आदी आपली दुकान आहेत . मुलांसाठी लहान पाळणे खेळणी व महिलांसाठी शृंगार उपयोगी दुकाने दाखल झाले आहेत
यात्रेसाठी अभानपुर गावाचे यादव ठेलारी,नाना ठेलारी,सुका ठेवणारी पदा ठेलारी, अशोक ठेलारी, काळु ठेलारी,सुका ठेलारी भागवत ठेलारी,दगा ठेलारी राजु ठेलारी देवी ठेलारी नाना ठेलारी
व ग्रामस्थ यात्रेसाठी परिश्रम घेत आहेत.