त-हाडी येथील माजी विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त दिला आठवणींना उजाळा..!
कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी येथे ‘गेट टु गेदर ‘ कार्यक्रम संपन्न
त-हाडी ता.५नोव्हेंबर २०२४= शालेय जिवणातील अनेक आठवणी घेत विद्यालयीन शिक्षण घेत जिवाभावी मैत्रीला वेगवेगळे मार्ग फुटतात.परंतु दिवाळीसणा निमित्त गावातील अनेक मित्र मैत्रिणी गावी येतात,आशा मित्रांना एकत्र येण्यासाठी तालुक्यातील त-हाडी येथील कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयातील विद्यार्थी एकत्र येत ‘गेट टु गेदर’ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
गावातील ज्या विद्यालया मध्ये परीसरातील विद्यार्थी शिक्षण घेत अनेक नोकरी, व्यवसायात मध्ये मोठे यश संपादन करतात तर काही विद्यार्थी कुशल शेती व्यवसायात मध्ये रममाण होतात .तालुक्यातील त-हाडी येथिल कै ,आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयातील अनेक विद्यार्थी आपल्या ज्ञानार्जना प्रमाणे वेगवेगळ्या नोकरीच्या माध्यमातुन पाच ते सहा अंकी पगारा पर्यंत यशस्वी झाले.
आशा विद्यार्थ्यानी ‘गेट टु गेदर’ च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येत विद्यालयीन अनुभव कथन केले,तर प्राचार्य,शिक्षकांच्या शिकवणीतील कटु-गोड आठवणींना उजाळा देत दिवाळीचा वेगळाच आनंद साजरा केला.यामध्ये इंजिनिअर, डाॅक्टर,शिक्षक,प्राध्यापक,वकील,सैनिक,लिपीक,कुशल शेतकरी,कुशल व्यावसायीक सारख्या हुद्या वरील विद्यार्थ्यांनी गेट टु गेदर कार्यक्रम संपन्न केला.यावेळी विद्यमान मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण माजी मुख्याध्यापक अशोक सोनवणे, यांचा शाल, श्रीफळ, सरस्वती मातेची प्रतिमा व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यावेळी संजय पाटील, राजेंद्र बोरसे मनोहर बोरसे जगन्नाथ सुर्यवंशी,, अनिता सावळे, शितल पाटील, दक्षा जाधव, भारती जाधव, सुनिता भामरे, राजेंद्र लोहार, रविंद्र भामरे, राजेंद्र भलकार, मनोज करंके प्रविण भलकार, रावसाहेब भामरे, महेंद्र खोंडे यांचा सहभाग होता.यावेळी मोठ्या प्रमाणात जुण्या आठवणींना उजाळ देण्यात आल्याचे दिसुन आले.
फोटो- कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी (२००१ बॅच)