या संघाची राज्यस्तरावर निवड
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने कोल्हापूर ,सांगली आदी बलाढ्य संघाला हरवून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धा लोणंद जि. सातारा येथे नुकत्याच पार पडल्या.
डाॅजबाॅल या क्रिडा प्रकाराच्या स्पर्धेत अंतरा वरवटकर,प्रिया अजगोलकर,अंतरा डोर्लेकर,ऋतुजा डोर्लेकर, रिया पावस्कर,नंदिनी जाधव,अन्वया पावरी,धनश्री बळकटे, सई पावरी,अक्षरा झर्वे या सहभागी झाल्या होत्या.या संघास क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या स्पर्धेत सलग तीन विजय मिळवत दि मॉडेल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने,तसेच मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थीनीचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले.तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही हा संघ उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करेल असा विश्वास व्यक्त केला. प्रशालेस संस्था,पालक यांचे चांगले सहकार्य, क्रीडा शिक्षकांचे सतत दर्जेदार मार्गदर्शन आणि विद्यार्थीनींनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश आंम्ही मिळवू शकलो,असेही श्री कोळेकर यांनी स्पष्ट केले. सर्व यशस्वी संघावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोल्हापूर विभागीय डाॅजबाॅल स्पर्धेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचा संघ विजयी.
या संघाची राज्यस्तरावर निवड
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने कोल्हापूर ,सांगली आदी बलाढ्य संघाला हरवून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धा लोणंद जि. सातारा येथे नुकत्याच पार पडल्या.
डाॅजबाॅल या क्रिडा प्रकाराच्या स्पर्धेत अंतरा वरवटकर,प्रिया अजगोलकर,अंतरा डोर्लेकर,ऋतुजा डोर्लेकर, रिया पावस्कर,नंदिनी जाधव,अन्वया पावरी,धनश्री बळकटे, सई पावरी,अक्षरा झर्वे या सहभागी झाल्या होत्या.या संघास क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या स्पर्धेत सलग तीन विजय मिळवत दि मॉडेल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने,तसेच मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थीनीचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले.
तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही हा संघ उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करेल असा विश्वास व्यक्त केला. प्रशालेस संस्था,पालक यांचे चांगले सहकार्य, क्रीडा शिक्षकांचे सतत दर्जेदार मार्गदर्शन आणि विद्यार्थीनींनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश आंम्ही मिळवू शकलो,असेही श्री कोळेकर यांनी स्पष्ट केले. सर्व यशस्वी संघावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.