यशवंतराव चव्हाण सेंटरचा कृतज्ञता पुरस्कार” 2025 श्री सुरेश ईश्वर पोटे यांना जाहीर
यशवंतराव चव्हाण सेंटर नेरूळ, नवी मुंबई चा “कृतज्ञता पुरस्कार” 2025 समाजभूषण श्री सुरेश ईश्वर पोटे अध्यक्ष – महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई – नवी मुंबई विभाग यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल
हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेमध्ये स्टर्लिंग कॉलेज नेरूळ येथे माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील मा. मंत्री यांचे हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था वुमन वेल्फेर फोरम (WWF) च्या श्रीमती कल्पना शिंदे, सौ वंदना गाडेकर, हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघांचे दिलीप गाडेकर, पुष्पा कांबळे, अक्षर कट्टा ग्रुप, वीस्टम ट्री ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संस्थानी श्री पोटे यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीने त्यांना लोकांचे आशीर्वाद प्रेरणा मिळाल्याने प्रोत्साहित होणार आहेत.
श्री सुरेश पोटे गेली 40 ते 45 वर्षांपासून धारावी, दादर, विक्रोळी, पुणे, नवी मुंबई नव्हे महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्य करत आहेत. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) जानेवारी 2025 च्या 34 व्या लातूर अधिवेशनात महाराष्ट्रात उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक सन्मान देऊन पुरस्कार देऊन गौरव केला होता. अखिल भारतीय वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असोसिएशनने पुणे अधिवेशनात ऑक्टोबर 2023 त्यांना हिंदवा महाराणा प्रताप अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.
नुकत्याच त्यांनी फेस्कॉम मुंबई नवी मुंबई विभागातर्फे ज्येष्ठान साठी विविध स्पर्धाचें आयोजन केले होते त्या स्पर्धाना उत्स्पुर्थ प्रतिसाद मिळाला.