अविष्कार बोबडे पडेगावकर याचा आज गंगाखेडात सत्कार
गंगाखेड प्रतिनिधी
लॉ कॉलेजला शिक्षण घेत असतानाच हार्वेस्ट सक्सेस अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली नेटवर्क उद्योग समूहात सुरुवात करत चांगली कामगिरी केल्याबद्दल गंगाखेड येथील राजेश्वर मंगल कार्यालयात मंगळवारी होत असलेल्या कार्यक्रमात अविष्कार सखाराम बोबडे पडेगावकर याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे.
मंगळवार18 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता डीपी रोडवरील राजेश्वर फंक्शन हॉल या या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. वकिलीचे शिक्षण घेत असताना mi lifestyle या हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या संस्थेत काम करत EAGLE डिस्ट्रीब्यूटर हे मानांकन मिळाले. याबद्दल त्याचा हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी ,mi लाईफस्टाईल चे ITC जयश्री बोंद्रे मॅडम,NTC अक्षय गोरटकर, RTC किशोर वागले, STC बालासाहेब नीरस,DTC शेषराव आवड यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे. या कामगिरीबद्दल अविष्कार बोबडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.