• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home देश-विदेश

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार· ……..राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण

माणगंगा by माणगंगा
August 23, 2021
in देश-विदेश
0
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार· ……..राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण

· राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण

नवी दिल्ली,

दि. 23 : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४४ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून खुर्शिद शेख आणि उमेश खोसे या दोन शिक्षकांचा यात समावेश आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रपतींच्या हस्ते व गडचिरोली व उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री शेख आणि श्री खोसे यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्हयातील असरअली येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक म्हणून खुर्शीद शेख यांची शिक्षणक्षेत्रात वेगळीच ओळख आहे. त्यांनी शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेत महत्त्वपूर्ण बदल घडविले आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी शाळेत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूल्याधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरिता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकता यावे यासाठी ५१ ऑफलाइन ऍपची निर्मिती केली. व्हिडिओ निर्मिती करून स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्य निर्माण केले आहे.

Views: 387
Share

Related Posts

ब्रेकिंग न्यूजपेट्रोल 9 रुपये 50 पैसे तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त…तर सिलेंडरला सबसिडी मिळणार
देश-विदेश

ब्रेकिंग न्यूज
पेट्रोल 9 रुपये 50 पैसे तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त…
तर सिलेंडरला सबसिडी मिळणार

May 21, 2022
भारत विर्च्युल युनिव्हर्सिटी तर्फे मानद डॉक्टरेट (Hon. Ph.D) स्वीकारतांना डॉक्टर प्रवीण निचत
देश-विदेश

भारत विर्च्युल युनिव्हर्सिटी तर्फे मानद डॉक्टरेट (Hon. Ph.D) स्वीकारतांना डॉक्टर प्रवीण निचत

May 7, 2022
साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा……भालचंद्र नेमाडे यांना मानाची फेलोशिप तर महाराष्ट्राला दोन अनुवाद पुरस्कार
देश-विदेश

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा……भालचंद्र नेमाडे यांना मानाची फेलोशिप तर महाराष्ट्राला दोन अनुवाद पुरस्कार

September 19, 2021
अहमदाबाद :– गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा  राजीनामा
देश-विदेश

अहमदाबाद :– गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

September 11, 2021
Next Post
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा दिनांक ३१ऑगस्ट ला सोलापूर दौरा !!

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा दिनांक ३१ऑगस्ट ला सोलापूर दौरा !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)