जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथे घरोघरी शाळा या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमास सुरुवात परिषद
अहमदनगर ;
नेवासा
नेवासा पंचायत समिती विभागाच्या सभागृहात जीवनप्रवास ज्ञानज्योतींचा व ज्ञानजागर या काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशनाचा कार्यक्रमात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील उपशिक्षिका श्रीमती सुनिता भाऊसाहेब निकम यांनी कोरोना लाँकडाऊनच्या काळात राबवलेल्या घरोघरी शाळा या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण पंचायत समिती नेवासा सभापती श्री.रावसाहेब कांगुने साहेब उपसभापती श्री. किशोर जोजार यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना काळात १००% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवणाऱ्या या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या प्रत्येक मुलाच्या घरीच स्वतंत्र शाळा तयार करून नियमित गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास अभ्यासाचा सराव करण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नेवासा बुद्रुक केंद्रातील भालगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सुनीता निकम यांनी या उपक्रमाची माहिती देताना म्हणाल्या की,ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचण्यात येणाऱ्या अडचणी व मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सदरचा उपक्रम राबवण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याचे माण तालुक्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या सदर उपक्रमामुळे १००% विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडीतपणे व प्रभावीपणे सुरू राहते.त्यामुळे विद्यार्थी प्रगत होतो.यावेळी उपस्थित सभागृहातील सर्व शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी ,साधनव्यक्ती ,विषयतज्ञ ,इतर सर्व कर्मचारी,माझे सर्व शिक्षक सहकारी यांच्यासह सर्व ज्ञानज्योती शिक्षिका उपस्थितांनी घरोघरी शाळा या उपक्रमाचे खूप कौतुक करुन शुभेच्छाचा वर्षाव केला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती श्री. रावसाहेब कांगुणे हे होते तर पंचायत समितीचे उपसभापती श्री. किशोर जोजार सदस्य श्री.बाळासाहेब सोनवणे गटविकास अधिकारी श्री.शेखर गटशिक्षणाधिकारी सौ.सुलोचना पटारे -पुरनाळे कवयित्री सौ.फासाटे शिक्षक बँकेचे संचालक श्री.राजेंद्र मुंगसे प्रकाशक श्री.नितीन गायके व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी निर्माण करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचे उपक्रमकर्ता यांनी या अप्रतिम उपक्रम श्री संजय लक्ष्मण खरात यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवून मुलांचे शिक्षणाला नवी उभारी दिली आहे लाँकडाऊनमध्येच शाळा बंद असल्यामुळे चिमुकल्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे घरी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.