विभूतवाडीत हनुमान उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
विभूतवाडी ता. आटपाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी हनुमान उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
दिनांक 06/10/ व 07/10/2022 रोजी हनुमान उत्सव साजरा होणार आहे
उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 6 रोजी सायंकाळी सात वाजता श्री बिरोबा देवाच्या व श्रीराम पालखीचे आगमन होणार आहे. या दोन्ही पालख्यांचे स्वागत फुलांच्या व फटाकाच्या आतिशबाजी मध्ये भव्य मिरवणूक काढून छबिना कार्यक्रम होणार आहे.
यासाठी फटाके सौजन्य व मंडप डेकोरेशन सौजन्य बी.ए. माळी कंट्रक्शन विभूतवाडी, रघुनाथ आबा मोठे, रघुनाथ सोमा खरजे यांच्या स्मरणार्थ चेतन रघुनाथ खर्जे, रामचंद्र देवराव मोटे, शहाजी श्रीपती पावणे, किसन दशरथ मोटे, रंगनाथ आप्पा मोटे रामचंद्र कृष्णा पावणे, जालिंदर कोंडीबा खर्जे व धीरज बाजी कांबळे यांचे सौजन्य राहणार आहे.
त्यानंतर शुक्रवार दिनांक 07/10/2022 रोजी सकाळी 7 वाजता श्री हनुमान देवाचा अभिषेक करण्यात येणार आहे
सकाळी 11 पासून दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे .या महाप्रसादाचे सौजन्य मधुकर अण्णां खर्जे, सद्गुरु बाळूमामा रिफायनरी सावंतवाडी प्रो.प्रा. सुरेश दादा मोटे यांचे सौजन्य राहणार आहे. तसेंच अक्वा वॉटर सौजन्य कै फुलाबाई भिमराव नांगरे यांच्या स्मरणार्थ श्री बबन मोटे यांच्यामार्फत पाणी पुरवले जाणार आहेत
त्यानंतर दुपारी 11 ते 5 पर्यंत गजीनृत्या चा कार्यक्रम होणार आहे. यासाठी सौजन्य तुकाराम मोटे(मुकादम) लक्ष्मण कृष्णा मोटे यांच्या स्मरणार्थ दुर्योधन लक्ष्मण मोटे, हनुमंत देवराव मोटे, नामदेव बिरू मोटे, राजाराम बाबा पावणे, नारायण पांडुरंग खर्जे, मोहन रामू खरजे, यांचे सौजन्य राहणार आहे
त्याचबरोबर संध्याकाळी 5.30 वाजता भव्य कुस्त्याचा जंगी कार्यक्रम होणार आहे. या कुस्तीसाठी युवक कुस्ती पैलवानांना प्रोत्साहन करण्यासाठी कै. सोपान काका गणू खाताळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती त्रिवेणी सोपान खताळ, हनुमंत बाबा लोहार, विलास विष्णू वाघमोडे, निवृत्ती गुंडा मोटे (वस्ताद )यांच्या स्मृती प्रित्यर्थ बाळू निवृत्ती मोटे, संत बाळूमामा मंदिर पांढरिवस्ती, तानाजी रामचंद्र पाटील यांच्या स्मृतीपित्यार्थ सुरज पाटील,जगन्नाथ विठोबा खर्जे जयंतीलाल गणपत खरजे, यांचे सौजन्य राहणार आहे.
तर सायंकाळी ठीक नऊ वाजता करमणुकीचा कार्यक्रम म्हणून धमाका म्युझिकल नाईट कोल्हापूर यांच्या कार्यक्रम होणार आहे. यासाठी नंदकुमार शंकर सकट, सचिन नंदकुमार भिसे, भीमराव शंकर खडसरे, राजेंद्र विष्णू लोहार व ग्रामस्थ मंडळ विभूतवाडी यांचे सौजन्य राहणार आहे
तरी परिसरातील व गावातील नागरिकांनी या हनुमान उत्साहामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान यात्रा कमिटी मार्फत करण्यात आले आहे.