• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मनोरंजन

नगर ची प्रतिक्षा गर्जे प्रथमच ” फरफट ” या मराठी सिनेमात झळकणार..!

माणगंगा by माणगंगा
July 20, 2021
in मनोरंजन
0
नगर ची प्रतिक्षा गर्जे प्रथमच ” फरफट ” या मराठी सिनेमात झळकणार..!

नगर ची प्रतिक्षा गर्जे प्रथमच ” फरफट ” या मराठी सिनेमात झळकणार..!

प्रतिनिधी-औरंगाबाद

तेजस मेघा फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत मेघा डोळस निर्मित आणि महेश्वर तेटांबे दिग्दर्शित “फरफट ” या सामाजिक मराठी सिनेमाचे चित्रिकरण नुकतेच औरंगाबाद येथील गणोरी गावांत पार पडलं. फरफट ” या सिनेमाची कथा -पटकथा -संवाद लेखन मेघा डोळस यांचे असून सिनेमाच्या दिग्दर्शनाची सर्वतोपरी जबाबदारी महेश्वर तेटांबे यांनी पेलली असून त्यांनी या सिनेमाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संगीतकार अतुल-राहुल यांनी नवोदित गीतकार विशाल आडबाल यांच्या गीतांना स्वरबद्ध केलं असून छायाचित्रण आणि संकलन ह्या जमेच्या दोनही बाजू विनायक जंगम यांनी सांभाळल्या आहेत. संदीप रावजी यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन काम केले आहे तर नाना जाधव यांनी रंगभूषाकार म्हणुन आपली भूमिका चोख पाडली आहे.

यांत नगरची प्रतिक्षा गर्जे प्रथमच या सिनेमात झळकणार असून तिचे महाराष्ट्रात कौतुक होत आहे. ही कथा आहे एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील वडिलांचे छत्र हरविलेल्या गतिमंद मुलाचा प्रगतीच्या दृष्टीने सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी आईची होणारी तळमळ त्यातूनही ती सावरत असताना तीची होणारी फरफट आणि त्यातून तीला काय मार्ग सापडतो ? मुलामध्ये सर्वांगीण बदल होतो की नाही ? हे ” फरफट ” या चित्रपटात मांडले आहे. या सिनेमात आईची प्रमुख मध्यवर्ती भूमिका मेघा डोळस यांनी साकारली असून यातील प्रमुख कलाकार संदीप रावजी, साक्षी नाईक, विशाल आडबाल, चंद्रकांत काळे, अक्षदा मोरे, कविता गायकवाड, विद्या गायकवाड, सिद्धेश लिंगायत, संतोष तांदळे, भाऊसाहेब उबाळे, यशवंत मुसळे, गुरुनाथ तिरपणकर, प्रमोद दळवी, राहुल शेजुल, प्रतिक्षा गर्जे, अण्णासाहेब (पप्पु) तांदळे, दादासाहेब जाधव आदी गणोरी ग्रामस्थांनी यांत सहभाग घेतला आहे. निर्मिती व्यवस्था महेंद्र तुपे यांनी पाहिली असून लवकरच ” फरफट ” हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल असा विश्वास निर्माती मेघा डोळस यांनी व्यक्त केला आहे.

Views: 481
Share

Related Posts

आटपाडीतील सिध्दनाथ चित्रमंदिरास भिरकीट चित्रपटातील कलाकारांची भेट- सिनेकलाकार व उपसरपंच विजय देवकर यांच्या हस्ते सन्मान
मनोरंजन

आटपाडीतील सिध्दनाथ चित्रमंदिरास भिरकीट चित्रपटातील कलाकारांची भेट- सिनेकलाकार व उपसरपंच विजय देवकर यांच्या हस्ते सन्मान

June 18, 2022
रक्त, आणि विचारांच्या वंशजांमूळे आंबेडकर चळवळ दिशाहीन.:- डॉ. राजन माकणीकर
मनोरंजन

रक्त, आणि विचारांच्या वंशजांमूळे आंबेडकर चळवळ दिशाहीन.:- डॉ. राजन माकणीकर

March 13, 2022
म.फुले यांच्या नावाचा पुरस्कार मग तो कोणत्याची क्षेत्रातला असो तो श्रेष्ठच_ मारुती शिरतोडे
मनोरंजन

म.फुले यांच्या नावाचा पुरस्कार मग तो कोणत्याची क्षेत्रातला असो तो श्रेष्ठच_ मारुती शिरतोडे

December 3, 2021
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे सोलापूर जिल्हयाची बैठक संपन्न…!
मनोरंजन

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे सोलापूर जिल्हयाची बैठक संपन्न…!

October 4, 2021
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा…!
मनोरंजन

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आयोजित भव्य ऑनलाईन स्पर्धा…!

August 15, 2021
महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मनोरंजन

महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

August 11, 2021
Next Post
गुळवंची कोरोनाचा हॉटस्पॉट बनतंय की काय ?

गुळवंची कोरोनाचा हॉटस्पॉट बनतंय की काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)