आटपाडी तील सरपंच पदाचा तिसरा वर्धापन दिन 32 कामाच्या शुभारंभाने साजरा
सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या सरपंच पदाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत घ्या 15 व्या वित्त आयोग निधीतून तब्बल 76 लाख रुपयांच्या विविध विकास कामांची उद्घाटने आटपाडी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री. अनिलभाऊ बाबर यांच्या शुभहस्ते करून साजरा करण्यात आला,
यावेळी आटपाडी तालुक्याचे नेते श्री. तानाजीराव पाटील, पंचायत समिती चे उप सभापती श्री. दादासाहेब मरगळे, आटपाडी ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील, आखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट श्री. धनंजय पाटील, माजी सरपंच सौ स्वाती रावसाहेब सागर, उपसरपंच प्रा.अंकुश कोळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री. डी.एम. पाटील सर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. दत्तात्रय पाटील पंच, श्री. सुबराव पाटील, श्री. आप्पासाहेब उर्फ पिनू पंच, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रकाश मरगळे श्री बाळासाहेब मेटकरी, श्री. चंद्रकांत हाके, श्री. प्रदीप लांडगे, श्री. विजयकुमार पाटील, श्री. नितीन सागर, सौ. लक्ष्मी राजेंद्र बालटे, सौ. सुवर्णा माळी, सौ. स्वाती देशमुख, सौ. रेखा ऐवळे, श्री. मधुकर माळी, श्री. राजेन्द्र बालटे, श्री. सर्जेराव राक्षे, श्री शिवाजीराव मेटकरी, ग्रामसेवक श्री.महादेव इंगवले, युवासेना अध्यक्ष श्री. संतोष पुजारी, श्री. अरविंद चव्हाण चेअरमन, शेटफळे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय देवकर, श्री. मनोज नांगरे पाटील, श्री. अभिजित देशमुख, श्री. दौलतराव चव्हाण पाटील, श्री. मधुकर माळी, श्री. सुहास देशमुख, श्री. मनोज देशपांडे, श्री उत्तमराव बालटे, श्री. सचिन सपाटे, इंजिनिअर श्री. एमजी चव्हाण, श्री. महेश चांडवले व
स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या 32 विकास कामानंतर लगेच आणखी विविध विकास कामे लवकरच मंजूर होऊन सुरू होणार असल्याचे सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागातील विकास कामे लवकरात लवकर सुचवावीत असेही आवाहन सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी केले आहे