डोंगरगाव ग्रामपंचायतीला आय एस ओ दर्जा प्राप्त
*===============================
डोंगरगाव ( प्रतिनिधी )
शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीला आज दिनांक 23 जून 2021 रोजी प्रथम मान्यवरांच्या हस्ते शिव प्रतिमापूजन कर न्यात आले व फिक्सेल टेक्स सर्विसेस लातूर विभागांतर्गत राहुल भोसले सर संजय व्यंकटराव पाटील व सहकारी यांनी आज रोजी ग्रामपंचायतीला भेट देऊन अद्यावत तपासणी करून भेट दिली मूल्यमापन नंतर या ग्रामपंचायतीस राहुल भोसले सर यांच्या हस्ते आय एस ओ प्रमाणपत्र देन्यात आले
यादिवशी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा, पाटील उपसरपंच आरोस्तोल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील ,उपसरपंच अशोक पाटील, ग्रा प सदस्य संजय जगन्नाथ पाटील ,पत्रकार आर आर पाटील ,गणेश पाटील, पांडुरंग कोली ,हिरालाल भिल ,ग्रामसेविका जयश्री पाटील, ग्रा प सदस्य, ग्रामस्थ इत्यादींच्या उपस्थितीत आय एस ओ दर्जा प्रमाणपत्र या ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आले