सरपंच शिवाजी खतगावकर यांचा सत्कार.
गुरू पोर्णिमा विशेष.
अहमदपूर ( प्रतिनिधी ) खतगाव प दे देगलूर ता मुखेड येथील विद्यमान सरपंच शिवाजी गो सोनकांबळे खतगावकर यांचा सत्कार गुरुवर्य व्यंकटराव बिरादार सर यांनी केला.
शिवाजी खतगावकर हे खतगाव प दे देगलूर ता मुखेड येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत. तर व्यंकटराव बिरादार सर हे लाल बहादूर शास्त्री विद्यालय मोटरगा ता मुखेड येथील सेवानिवृत्त सह – शिक्षक आहेत.सर आँगस्ट २००९ मध्ये सेवानिवृत्त झाले.सरांच्या मुळ गावी सुलाळी डोंगरगाव येथे ते छोट्या मुलासोबत शेती करत आहेत. सरपंच शिवाजी खतगावकर हे लालबहादूर शास्त्री विद्यालय मोटरगा येथील माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी परवा सरांच्या मुळ गावी जाऊन सदीच्छा भेट घेतली.
यावेळी सरपंच शिवाजी खतगावकर यांचा सरांनी पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर तासभर जुन्या आठवणींत रममाण झाले,जुन्या आठवणीना उजाळा दिला.
विशेष म्हणजे , मुखेडचे माजी आमदार श्री हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर हे मोटरगा येथील एक सधन शेतकरी श्री विठ्ठल राव पाटील भिसे यांच्याकडे येत.विठ्ठलराव पाटलांसह बिरादार सरांच्या शुभेच्छा घेऊन बेटमोगरेकर पाटील यांनी निवडणूक लढवली आणि ते यशस्वी झाले. पुढे सतत यशस्वी झाले. अशी आठवणही सरांनी सांगितली. यावेळी सरपंच शिवाजी खतगावकर यांच्या सोबत प्रा भगवान आमलापुरे उपस्थित होते. सरपंच शिवाजी खतगावकर आणि प्रा भगवान आमलापुरे हे लाल बहादूर शास्त्री विद्यालय मोटरगा येथील वर्गमित्र आहेत.