पुसद,दि.२४जुलै,
कोकणात नैसर्गिक अतिवृष्टीमूळे भयंकर हानी झाली आहे. त्यामध्यें चिपळूण, रत्नागिरी, या जिल्ह्यामध्यें तर खुपच भयंकर परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन ठप्प झाले आहे.आणि परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
अश्या संकटकालीन परिस्थिती मध्यें माणुसकीच्या नात्याने आपल्या देशबांधवाच्या मदतकार्यासाठी नेहमी तत्पर असणारी संघटना जमात ए इस्लामी हिंद,पुसद शाखेच्या तर्फ़े युथ विंग आणि IRW चे ४ कार्यकर्ते मुहम्मद मुद्स्सीर,सय्यद सलीम, मुहम्मद सलमान व अब्दुल मोहित कोंकणात मदतकार्यासाठी पुसद येथून आज निघाले आहे.आपण सर्व अल्लाह समोर प्रार्थना करूया की, जो महाराष्ट्रात पूरसंकट आलेलं आहे.विषेश करून कोकणात याला दूर करून सर्व बांधवांना सुख आणि समृद्ध प्रदान करो आणि जे देशबांधव आशा गँभीर परिस्थिती मध्यें मदतकार्य करत आहे त्यांची सुद्धा अल्लाह मदत करो ,आमीीी