कुसुंबा येथील लग्नसमारंभात नवरदेवासह ११ दात्यांचे रक्तदान, वऱ्हाडी सहभागी
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने उपक्रम
उन्हाळ्यात रक्त तुटवडा निर्माण होत असल्यापाट पुढाकार.
विवाहासारख्या पवित्र विधीत सामाजिक भावना जोपासता यावी यासाठी कुसुंबा (ता.जि.जळगाव) येथील विवाह सोहळ्यात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात नवरदेवासह ११ दात्यांनी रक्तदान केले.
ची.निर्मल व चि.सौ.का.तेजस्वी यांचा विवाह कुसुंबा येथील अहिंसातिर्थ आर.सी.बाफना.गोशाळेत पार पडला.यावेळी ज्युनिअर चार्ली फाँडेशन औरंगाबाद चे कलाकार सुमित पंडित यांनी आपल्या चार्ली चाँप्लीन च्या वेशभूषेत मुख अभिनयातुन लग्न समारंभास आलेल्या सर्व पाहुण्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवुन देत होते.चेतन पाटील माणुसकी समुह जळगाव जिल्हा उप अध्यक्ष यांच्या प्रस्तावातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरमाला टाकल्यानंतर लगेच नवरदेवासह ११ दात्यांनी रक्तदान केले,संदीप पाटील,अमोल पाटील,
प्रदीप पाटील,गजानन मोरे,महेश पाटील,रितेश भानवकर
चेतन पाटील,तुषार नाथ,वैभव उगले,सचिन पवणे आदिनी रक्त दान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माणुसकी रुग्ण सेवा समुहाच्या टिम ने केले.
वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेली पाहुणे मंडळी,तरूण समाज बांधवांनी देखील रक्तदान केले.या उपक्रमात माणुसकी सेवा समुहाचे कमलाकर माळी,
गजानन क्षिरसागर,अनिल पाटील,राजेंद्र पाटील,
समाजसेवीका पुजा पंडित,वंदना पाटील,स्वाती पाटील,मनिषा पाटील,आदिनी परिश्रम घेतले
रक्तदान शिबिरे घेणे हि काळाची समाजसेवक सुमित पंडित यांनी केले आव्हान
या उपक्रमाची चर्चा होती.रक्तदान काळाची गरज उन्हाळ्यात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासतो. यामुळे रक्तदान शिबिरे घेणे गरजेचे आहे. रक्तदाना विषयी आम्ही चार्ली चाँप्लीन च्या वेशभूषेत जावुन आपल्या मुख अभिनय कलेतुन खेडेपाडे, गाव वस्तीवर जनजागृती करतो. लग्न समारंभ, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथीला रक्तदान शिबिराचे आयोजन व्हावे, असा प्रयत्न असतो. त्यास प्रतिसाद मिळतो.माणुसकी ग्रुप समाजासाठी खुप छान काम करते.त्यांना समाजासाठी जे सेवाकार्य अविरत पणे चालु आहे ते तरुनांना प्रेरणादायी आहे.
—-समाजसेवक सुमित पंडित सु- लक्ष्मी संस्थापक अध्यक्ष