त-हाडी – वरुळ परिसरात लम्पी आजाराने डोके वर काढल्याने पशुपालक धास्तावले
त-हाडी,ता.२४ (प्रतिनिधी) गत सहा महिन्या पासून आटोक्यात आलेल्या स्कीन लंपी आजाराने आता पुन्हा डोके वर काढले असून पशुवैद्यकिय दवाखाने अधिकारी व कर्मचाऱ्या अभावी धूळखात पडले असल्याने पशुधन संकटात सापडून पशुपालक धास्तावलेल्याचे चित्र त-हाडी वरुळ (ता.शिरपुर) परिसरात पाहवयास मिळते.
गत वर्षभरापूर्वी जनावरांमध्ये संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या आजारामुळे गुरांचे बाजार तब्बल तीन महिने बंद राहिल्याने सर्वत्र उलाढाल मंदावून पशुपालनावर त्याचा परिणाम झाला. शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात या आजाराने ११ गुरांचा मृत्यू ओढवला गेला, शासनाने पशु पालकांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप त्यांना मदतीची प्रतिक्षा लागून आहे. या आजाराने उशिरा का होईना आपला गाशा गुंडाळला होता परंतु आता चोरट्या पावलांनी पुन्हा शिरकाव केल्याचे पाहवयास मिळते.
गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांमध्ये या”लंपी स्कीन डिसीस” या साथीच्या आजाराने शिरकाव केला असून हा आजार गायीं, म्हशी, शेळ्या, मेंढ्या मध्ये दिसून येत आहे. गायीं वंशात याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव असल्याचे दिसुन येते. त-हाडीसह वरुळ, भटाणे येथे या आजाराने ग्रस्त गुरं सापडून आल्याने पशुपालकांनी धास्ती घेतल्याचे पाहवयास मिळते.
त-हाडीसह ममाणे. अभानपुर. जळोद त-हाडकसबे, परीसरात पंचवीस गiवात पंधरा हजारावर पशुधन असुन येथे पशु रूग्णालय उभारून पशुसंर्वधनासाठी पशुवैद्यकिय अधिकारी -कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे.परंतु सरकारी अधिकारी -कर्मचारी शहरवासी झाल्याने पशुवैद्यकिय रुगणालयास अवकळा प्राप्त होऊन पाळीव पशुंवर खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर उपचार करीत आहे.यापूर्वी उपचाराअभावी परिसरातील खुरकुत, फऱ्या, घटसर्फ आजारा मुळे अनेक जनावरांचा मुत्यू झाला.मात्र कुणी गांभीर्याने न घेतल्याने पशुधनाच्या आकड्यात घट झाली.
परिसरात बहुतांश जनावरांच्या शरीरावर छोटे, छोटे पुरळ येवून त्याचे मोठ्या गाठीमध्ये रूपांतर होत आहे.यामुळे जनावरांच्या फुफ्फुस लिव्हरवर याचा परिणाम होतो. जनावरांच्या डोळ्यातुन व नाकातुन पाणी येवून त्यांना ठसका लागून ताप येतो. या आजारामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण एक टक्का असले तरी संसर्गाने बाधीत होण्याचे प्रमाण मात्र, अधिक आहे.
डॉ. राजेंद्र ओझरकर(पशुधन वैद्यकिय अधिकारी त-हाडी) ,’ लंपी आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. संतुलीत आहार व खनीजमिश्रित खाद्य जनावरांना दिल्यास जनावरांत रोग प्रतिकार शक्ती वाढते. ज्या ठिकाणी जनावरे बांधली जातात तो परिसर स्वच्छ व निर्जुतुकीकरण करणे गरजेचे आहे.
हा आजार संसर्गजन्य असल्याने बाधीत जनावरांच्या सानिध्यात येणारे जनावरे बाधीत होतात. त्यामुळे आजारी जनावरांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. “
सोबत फोटो : –
त-हाडी (ता.शिरपुर) : येथील मच्छिंद्र लकडू सोनवणे याचा लंपी आजाराने ग्रस्त बैल