कोल्हापुर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले पुणे जिल्ह्यातील कोंढापुरी ग्रामस्थ….
कोल्हापुर
(माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
गेल्या दिड वर्षांपासून वाढत जाणाऱ्या कोरोना संसर्ग मधून सावरत असताना अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडलेल्या कोल्हापुरकरांसाठी पुणे जिल्हयातील पुरग्रस्तांसाठी कोंढापुरी ( ता. शिरूर ) ग्रामविकास फाऊंडेशन च्या माध्यमातून कोंढापुरी ग्रामस्थांनी एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत संकलित केलेल्या १ लाख रुपयांचा निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे १००किट वाटप करून संकट काळात मदतीला धावून आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामविकास फाऊंडेशनने १लाख रुपयांचा निधी संकलित केला त्यामधून २०प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येकी 1 हजार रु. प्रमाणे १०० किट तसेच ४० पाणी बॉटल बॉक्स इतकी लाखमोलाची मदत कोल्हापूर जिल्ह्यासाठी पाठवून दिली.
कोडोली येथे शाहुवाडी पन्हाळ चे प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे , पन्हाळा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी तुळशीदास शिंदे , पन्हाळा आरोगय अधिकारी अनिल कवठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोडोली येथील १८ पुरग्रस्तांना प्राथमिक स्वरूपात जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले . कोंढापुरी ग्रामविकास फाऊंडेशन आणि ग्रामस्थांनी केलेल्या मदतीचे उपस्थितीत अधिकाऱ्यांनी आभार मानले . कोढापुरी ग्रामविकास फाऊंडेशन चे समन्वयक मा श्री .धनंजय गायकवाड यांच्यासह संतोष गायकवाड , अमित गायकवाड , राहुल दिघे , सोमनाथ गायकवाड , वैभव गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्ह्याला दिलेल्या या मदतीबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापुर जिल्ह्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पुणे येथून आलेले हे १०० किट शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ या चार तालुक्यातील बाधितांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी यांनी याप्रसंगी सांगितले.
कोडोली ता. पन्हाळा येथे प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलेल्या या किट वाटप प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत प्रबोधन समिती प्रमुख संदिप जंगम , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अरुण यादव, जिल्हा संघटन मंत्री जगन्नाथ जोशी, जिल्हा सदस्य प्रविण बुरांडे , पन्हाळा तालुका अध्यक्ष दत्तात्रय धडेल , तालुका सह संघटक नितीन पाटील , कोषाध्यक्ष दत्तात्रय मिटके आदि उपस्थित होते .