नंदुरबार ते चोपडा बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान
तऱ्हाडी:- तऱ्हाडी हुन कंळबू सारंगखेडा .कोपर्ली मार्गे जाण्यासाठी प्रवासी बांधवांना आपल्या नातेवाईकांन कडे जाण्यासाठी अडचण येत होती परंतु ही अडचण लक्षात घेऊन खोंडामळी कोपली मार्गे नंदुरबार चोपडा ही बस चालू करण्यात आली
सदर बस नंदुरबार ही वरून सकाळी ७ वाजता सुटून कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, शिंद्धगव्हाण, काकर्दे, जुनमोहिदा, कोपर्ली, मांजरे, बह्याने, निमगुळ, सारंगखेडा, कळंबु, कुकावल, वडाळी तऱ्हाडी, भटाणे, वरूळ, अर्थे, भामपूर फाटा, शिरपूर, बभळाज, नागेश्वर मंदिर, अनेर फाटा, हातेड, चोपडा अशी जाईल व चोपडा हुन सकाळी ते साधारण ११:३० वाजता परत निघेल तरी सर्व प्रवाशी बांधवांनी सदर गाडी प्रवास करून राज्य परीवहन महामंडळला सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख यांनी केले आहे
तऱ्हाडी येथे प्रवाशी बस प्रथमच आल्याने येथील नागरिकांनी बस चालक छोटु गोसावी व वाहक रविंद्र पाटील यांचे विशाल करंके यांनी श्रीफळ देऊन स्वागत केले नंदुरबार चोपडा या बस नियमित व वेळेवर दोन्ही आगार मधुन सोडावी अशी प्रवाशी बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली आहे
फोटो – चोपडा ते नंदुरबार नविन बस चालक व वाहक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करताना विशाल करंके व गंगाधर पाटील