बचेरी ग्रामपंचायतीचे जल जीवन मिशनचे काम प्रगतीपथावर…
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
माळशिरस तालुक्यातील बचेरी हे गाव कायम दुष्काळी म्हणून ओळखले जाते . अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे या गावाला ऐन पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो .
सध्या बचेरी गावाला जलजीवन मिशनच्या योजने अंतर्गत पिलीव च्या लगत वीहिराला जागा विकत घेऊन तब्बल सात किलोमीटरवरून पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी काही दिवसापूर्वी पिलीव येथील निरा उजवा कालव्याचे नजीक सुरेश घोंगडे यांच्या शेतात दोन गुंठे जागाही ग्रामपंचायतला अल्पदरात देण्यात आली आहे .
यासाठी थ्या जागेसाठी सुमारे तब्बल पाच लाख रुपये खर्च आला होता जनतेचे आमदार उत्तमरावजी जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पैशाची देणगी स्वरुपात पूर्तता केली होती या योजनेअंतर्गत विहीर खोदाईचे काम पूर्ण झाले असून आता पाईपलाईनचे काम चालू आहे अधिकृत ठेकेदार तानाजी कागदे यांनी अत्यंत दर्जेदार पद्धतीने काम केले जात आहे
सदरच्या योजनेद्वारे तीन ठिकाणी तीन टाक्यांच्या द्वारे गावाला पाण्याचा पुरवठा होणार आहे त्यापैकी बचेरी शिव येथे एक लाख वीस हजार लीटर क्षमतेची मुख्य पाण्याच्या टाकी त्याचे बांधकाम सुरू आहे तर दुसरी टाकी खरात वस्ती व तीसरी टाकी काटे वस्ती येथे प्रत्येकी 26000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे या योजनेमुळे प्रत्येक घरी पाण्याचा नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सोय केली जाणार असुन पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबणार आहे
सदरचे जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी होणारा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा लवकरच पूर्णत्वाकडे जाणार असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करावे व सदर कामाला प्रत्येक नागरिकांनी भेट देऊन कामाच्या दर्जाबाबत पहाणी करावी व सुचना ही कराव्यात असे आवाहन बचेरीच्या कार्यतत्पर सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड यांनी केले आहे