डोंगरगाव जीआई सार्वजनिक वाचनालयात विविध कार्यक्रम *.
____________________
डोंगरगाव (प्रतिनिधी)_ आर आर पाटील_
शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे जीआई सार्वजनिक वाचनालय असून या वाचनालयात नेहमी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात अलीकडच्या काळात विद्यार्थी वाचन संस्कृती पासून दुरावत चालले आहेत
याचाच एक भाग म्हणून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून “वाचन संकल्प ” हा उपक्रम राबविण्यात आला याचाच एक भाग म्हणून डोंगरगाव येथे जि आई सर्वजनिक वाचनालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी ” सामूहिक वाचन ” हा कार्यक्रम राबविण्यात आला पुस्तके सामूहिक वाचन करण्यात आले
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वाचक विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदविला यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश त्र्यंबक पाटील व सचिव सुवर्णा प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती