महाराष्ट्र विशेष जण सुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाही व संविधानाची गळचेपी. संदेश आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावर, त्यांनी दिलेल्या लोकशाही वर घाला घालण्याचे काम काँग्रेस सह आता भाजपा सरकार सातत्याने करत आले आहे. या घटनेचा जाहीर आणी कठोर शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सविधान पक्षाचे सुप्रिमो मा. संदेश आंबेडकर म्हणाले.
संदेश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे पंतु असून ते पुढे म्हणाले कि, संविधान बदलण्यासाठी.., लोकशाही पायमल्ली सातत्याने महाराष्ट्र राज्यात सातत्याने केली जात आहे. संविधान विरोधी कारवायाना जोर आलेला आहे. संविधानाच्या मूळ तरतुदी म्हणजेच आर्टिकलं 14, 19 व 21 या मूलभूत अधिकारावर समता, स्वतंत्रता आणि जीवन जगण्याचा अधिकार या अधिकारावरच घाला घालण्याचे काम हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे.
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक लोकांच्या अधीकार व हक्कावर गदा आणणारा कायदा होय. हा कायदा अंमलात आल्यास लोकशाही संपवून संविधानावर फार मोठा घाला घातला जाणार आहे. एकंदरीत संविधानच बदलण्याची प्रक्रिया या सत्ताधारी सरकारने चालवली आहे असे म्हणणे नाकारता येणार नाही.
शासन नवीन कायदा आणू पाहत आहे त्यावर सरकारच्या विरोधात आंदोलन करता येणे अशक्य राहणार आहे. नवीन आणलेल्या कायद्या अंतर्गत सेकशन 2, 5 आणि 8 अंतर्गत सरकारच्या विरोधात आंदोलन कराल, सरकारच्या विरोधात लीखान कराल. सरकारच्या ऊनिवा स्पस्ट कराल. सरकारच्या धोरणनावर टीका कराल, त्यासाठी रस्त्यावर उतराल किंवा आंदोलन कराल. तर या सर्व गोष्टी बेकायदेशीर ठरवून सरकार तुम्हाला अर्बन नक्षली ठरवून सरकार तुमच्या विरुद्ध कठोर कारवाई करेल. शिवाय सरकार तुम्हाला न सांगता अटक करुन बेल नाकारेल व 2 ते 7 वर्षाचा तुरुंगावस आणि 2 ते तीन लाखाचा दंड सुध्दा ठोठावेल.
या सरकारच्या विरोधात बोलता येणार नाही. लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे. त्यामुळे या विधेयकाचा विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे सर्व जाती धर्माच्या संस्था व संघटनानी मिळून या विधेयकाचा विरोध करावा. असे आवाहन संदेश आंबेडकर यांनी व्यक्त केले… तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तर उतरण्याचे आदेश दिल्यास महाराष्ट्र भर आंदोलन करू असे मत पक्षाचे संस्थापक महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.