कोल्हापूर दि. ८ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प तीन पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली . जोतिबा मंदिराला सोनेरी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
श्री . जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात .
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळे निमित्त कमळ पुष्प तीन पाकळ्यातील महापूजा बांधली . ही पूजा अंकुश दादर्णे ,दगडू भंडारे, श्रीनाथ झूगर, बाबासाहेब लादे , गजानन लादे, शशिकांत भोरे यांनी बांधली . पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे . नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री . जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते . त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते .
तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे . सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला . . मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम झाला . रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले .
जोतिबा मंदिर परिसराला आधुनिक पद्धतीन सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर सुवर्णमय केला आहे.