कोल्हापूर दि. ९( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)
नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .
श्री . जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात . नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळे निमित्त कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधली . या पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे . नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री . जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते . त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते . मानाचे गावकर यांना या पुजा बांधण्याचा मान आहे . तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे . दोन पाकळ्या या सगुण _ निर्गुण भक्तीचे प्रतिक मानले जाते .ही पुजा नितीन लादे , प्रविण भंडारे , सदाशिव भोर , अंकुश दादर्णे यांनी बांधली . सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला . नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो . मच्छिंद्र डवरी, गजानन डवरी , विश्वनाथ डवरी यांनी डवरी गीते सादर केली .
एक वेळ अभिषेक ः नवरात्रोत्सवात मंदिरातील नित्य धार्मिक विधी मध्ये बदल होतात . इतर वेळी सकाळी ९ व दुपारी ३ वाजता असा दोन वेळा होणारा अभिषेक नवरात्रोत्सवात मात्र पहाटे ५ वाजता एखदाच होतो .
ऑन लाईन दर्शन पास चा सावळा गोंधळ शनिवारी सुरुच राहीला . सकाळी ऑन लाईन लिंक वर दर्शन पास फुल्ल झाले म्हणुन दाखवित होते . दर्शन पास रांग ओस पडली . या वेळी दर्शन पास नसणाऱ्यांनाही मंदिर प्रवेश दिला जाऊ लागला . दोन तासा नंतर परत ऑन लाईन दर्शन पास सक्तीचे करून मंदिर प्रवेश दिला जाऊ लागला . भाविकांमध्ये या गोंधळामुळे सभ्रमावस्था निर्माण झाली .