कोल्हापूर दि . १०( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
जोतिबांचे मंदिर उघडल्या नंतर च्या पहिल्याच रविवारी जोतिबा दर्शना साठी भाविकांची अलोट गर्दी झाली . जोतिबाचा जागर मंगळवारी . आहे. नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली .
नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला निमित्त कमळ पुष्प पाच पाकळ्यातील ही पुजा गजानन लादे , प्रविण भंडारे , दगडू भंडारे , अंकुश दादर्णे , रमेश ठाकरे यांनी बांधली . सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला . नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो . रविवारी पहाटे पासूनच भाविकांची जोतिबा डोंगरावर येण्यास प्रारंभ झाला . मंदिरा सभोवती दर्शन रांगा लागल्या होत्या . पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता . दर्शन मार्ग गर्दीने फुलून गेले होते .
बाजार पेठ भाविकांच्या गर्दीने खचाखच भरल्या होत्या . मंदिराकडे जाता येताना भाविकाना गर्दीच्या दाटीवाटी तुन मार्ग काढावा लागत होता . उत्तर दरवाज्याजवळ मंदिरातुन बाहेर पडणारे भाविक आणि दर्शना साठी जाणाऱ्या भाविकांची एकत्र गर्दी झाल्याने दुपारी १२ च्या सुमारास मोठा गोंधळ उडाली . ऑन लाईन दर्शन पास धारक दर्शन झाल्याने समाधानी होते . ज्या भाविकांना ऑनलाईन दर्शन पास मिळाला नाही त्यांनी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन नाराजी व्यक्त करीत माघारी परतले .
.ऑन लाईन दर्शन राग २ कि.मी अंतरापर्यंत पोहचली होती . सकाळी पासुनच ऑन लाईन लिंक दर्शन पास काढण्यात भाविक व्यस्त होते . भाजपा , मनसे शाखा , स्थानिक पुजारी यांच्या वतिने ठिक ठिकाणी ऑन लाईन दर्शन पास कक्ष उभारले होते . ज्याच्या कडे ऑन लाईन पास नव्हते त्यांनी . मुख दर्शन रांगेचा मार्ग पकडला .
दहा वर्षाच्या आतील व ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र दर्शना विना मंदिरा बाहेर थांबावे लागले . लहान मुलांना रांगेच्या बाहेर घेऊन सांभाळताना आई वडीलांची मोठी तारांबळ उडाली .
रविवार सुट्टी वार ‘ चौथी माळ आणि सोमवारी महाराष्ट्र बंद च्या कारणाने भाविकांनी रविवारीच जोतिबा दर्शन करण्याच्या निर्णयाने प्रचंड गर्दी झाली .