कोल्हापूर दि .१२( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला .
महाराष्ट्र सह कर्नाटक भाविकांनी तेल ‘ कडाकणी , ऊस अर्पण करून ऑन लाईन दर्शन पास ने जोतिबां चे दर्शन घेतले .
दख्खनचा राजा श्री . जोतिबा नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला जागर झाला . पाच कमळ पुष्पामध्ये बैठी सालंकृत महापूजा बांधली . ही पूजा प्रविण कापरे , अंकुश दादर्णे ,रमेश ठाकरे’, श्रीनाथ झूगर , जालिंदर नवाळे , हिम्मत नवाळे’ पुजारी यांनी बांधली . जोतिबा देवासमोर प्रतिकात्मक अश्व पूजा बांधण्यात आली . जोतिबा मंदिर गाभा ऱ्यात जेरबेरा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती . श्री काळ भैरव ,श्री . चोपडाई ‘ श्री . यमाई देवीची ही कमळ पुष्पामध्ये पूजा बांधण्यात आली .सकाळी १० वाजता धुपारती सोहळा निघाला .फलाहाराची पाच ताटे नैवेद्य यमाई मंदिराकडे वाजत गाजत गेला .धुपारतीचे सडा रांगोळी घालून ऐ सुवासिनी नी औक्षण केले . सुगंधी दुध वाटप केले .
नवरात्र उपासकांनी जागरा निमित्त एक वेळ फराळ केला . भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मंदिरा समोर ऑन लाईन दर्शन पासच्या रांगा लागल्या होत्या . महाराष्ट्र सह कर्नाटक भागातून आलेल्या भाविकांची गर्दी मोठी होती . मंदिरात ऊस ‘ कडाकणी तेल अर्पणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली . कोडोली पोलिस स्टेशन चे सपोनि दिनेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन रांग व्यवस्था चोख ठेवण्यात आली . एस .टी. महामंडळाने जादा गाडया ची संख्या कमी होती . केली .कर्नाटक मधुन जादा गाडया येत होत्या . खाजगी वहातुक ही मोठया प्रमाणात होती . रात्री जोतिबा स्थानिक भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला . रात्रभर मंदिर खुले राहणार आहे .