कोल्हापूर दि. १ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)
गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री जोतीबा देवाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कोल्हापूर जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर आले होते . श्री . जोतिबा हे प्रमोद सावंत यांचे कुलदैवत आहे . जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री .जोतिबाचे दर्शन घेतले.
यावेळी समस्त गुरव समाजाच्या वतीने जोतिबा मंदिरात फेटा बांधून आणि श्री . जोतिबाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याबरोबर पन्हाळा तहसीदार रमेश शेंडगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, देवस्थान समितीचे प्रभारी दीपक म्हेत्तर, विष्णुपंत दादर्णे आदी उपस्थित होते.
गेली १० वर्षे गोव्यात भाजपचे सरकार आहे आणि हे सरकार विकासाचं आणि समृद्धीचं आहे. गोव्याची जनता भाजपबरोबर आहे . त्यामुळे तृणमूल काँग्रेस येऊ दया नाहीतर आप येऊ दया २०२२च्या गोवा निवडणुकीत पुन्हा भाजपचेच सरकार येणार अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
श्री .जोतिबाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारत देशातून भाविक दर्शनासाठी येतात. या तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रातील यापूर्वीच्या सरकारने आणि सध्याच्या सरकारने देखील विशेष प्रयत्न केले आहेत, हे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने भविष्यातसुद्धा असे प्रयत्न सुरू ठेवावेत, असे मत व्यक्त केले.
या वेळी सचिन ठाकरे ,भाजपाचे पदाधिकारी ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते .
दरम्यान बिग बॉस सिझन ३ चा विजेता विशाल निकम यांने ही वर्षाच्या प्रारंभी दख्खन चा राजा श्री .जोतिबाचे दर्शन घेतले. भाविकांची जोतिबा दर्शना साठी मंदिरात मोठी गर्दी केली होती .