कोल्हापूर प्रेस क्लब येथे संमेलनाच्या नियोजनार्थ पत्रकार परिषद संपन्न…!
आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने बुधवार दि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ०३.३० वाजता कोल्हापूर प्रेस क्लब, कोल्हापूर येथे नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सहभागी झाले होते. या पत्रकार परिषदेत चित्रपटसृष्टीमध्ये आपले भरीव योगदान देणाऱ्या चित्रकर्मींना अनुक्रमे चित्रश्री, चित्रभूषण, चित्ररत्न व चित्रमहारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यांत आला.त्याचप्रमाणे हे पहिले वाहिले (द्विदिवसीय) संमेलन बुधवार आणि गुरुवार दिनांक २७ आणि २८ एप्रिल या महिन्यात पारपाडण्यात येणार असून यासंमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.श्री.नानासाहेब पटोले यांच्य हस्ते होणार आहे.
या पत्रकार परिषदेत निर्माता महामंडळाचे संस्थापक, अध्यक्ष देवेंद्र मोरे, खजिनदार मनिष व्हटकर, संचालक, चित्रपट दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष मुरलीधर दिक्षित, राष्ट्रीय बहुजन महासंघचे संस्थापक,अध्यक्ष मारुती गायकवाड, अशोक सूर्यवंशी, उमेश जाधव, रंगराव कोटकर, संतोष तोडकर, सुनिल देसाई, सतिश बिडकर, इम्तियाज बारगीर, प्रकाश निकम, मोहिनी खोत, अण्णासाहेब उपाध्ये, अशोक माने, श्रीकांत (बाबू ) गावकर ,जयश्री प्रमोद पाटील तसेच कोल्हापूर मधील अनेक निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तसेच स्थानिक पत्रकार, सोशल मिडीया आदी मान्यवर उपस्थित होते. तेव्हा एप्रिल मध्ये होणाऱ्या संमेलनाला कोल्हापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे पहिले वाहिले संमेलन यशस्वीरित्या पार पाडावे असे आवाहन अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी केले.
महेश्वर तेटांबे,
संचालक, दिग्दर्शक, पत्रकार
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ