कोल्हापूर दि. ४ (माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
शासनाने गुरुवारी कोरोना निर्बंध शिथील केल्याने जोतिबा मंदिरात दहा वर्षाखालील लहान मुलांना शुक्रवारपासून मंदिरात सोडण्यास सुरूवात केली. तासाला भाविकांची संख्यादेखील २ हजारांपर्यंत वाढवण्यात आली असून ईपास बंधनकारक असेल अशी माहिती केदारलिंग देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी दिपक म्हेत्तर यांनी दिली. आहे.
राज्य शासनाने गुरुवारी कोरोना निर्बंध अधिक शिथील केले आहेत .त्यानुसार सर्व धार्मिक स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे जोतिबा मंदिरात लहान मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. जोतिबा मंदिरात शुक्रवारपासूनच याची सुरूवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वी लहान मुलांना सोडण्यावरून आंदोलन झाले होते . शासन दरबारी , लोकप्रतिनिधीना निवेदन पत्रे देण्यात आली होती . लहान मुलांना मंदिर प्रवेश बंदी चे भाविकांतून प्रचंड नाराजी व्यक्त करीत होते . मंदिर प्रवेश नाकारल्या मुळे अनेक वेळा मंदिर कर्मचारी व भाविकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले .अखेर लहान मुलांना मंदिरात प्रवेश मिळाल्याने भाविकांची फार मोठी अडचण दूर झाली आहे.