वेसावची श्री हिंगलाई या लघु चित्रपटाचा प्रिमियर शो कलावंत, तंत्रज्ञ आणि कोळी बांधवांच्या संचात धुमधडाक्यात संपन्न…!
परम पुज्य सद्गुरु श्री भाऊमहाराज वेल्हाळ यांच्या शुभ आशिर्वादाने भुमी निर्मित, वेसावकर्स रवि राज रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत रविंद्र खर्डे निर्मित वेसावची श्री हिंगलाई या लघू चित्रपटाचा प्रिमियर शो नुकताच वर्सोवा येथील साई एकवीरा बँक्वेट , सांस्कृतिक भवन मध्ये कलावंत, तंत्रज्ञ आणि कोळी बांधवांच्या समूह संचात संपन्न झाला. या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक विजय पाटकर, इंटरन्याशनल बिझनेस कोच इरफान कवचाली सर, कलाकार सुरेश डाळे, दिग्दर्शक राहुल मौजे, लेखक,दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, कार्यकारी निर्माता, समाजसेवक, पत्रकार, इव्हेंट मॅनेजर गणेश तळेकर, चित्रपट दिग्दर्शक,पत्रकार महेश्वर तेटांबे, गायक दादुस, लघु चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद लेखक- दिग्दर्शक आबा पेडणेकर, सह दिग्दर्शक रोहीत गांगुर्डे, छायाचित्रकार राजेश नडोणे, सोमनाथ कोळी, नरेश वेसावकर, संगीतकार तसेच संकलन कर्ते सोमनाथ कोळी, महेंद्र कोळी, गीतकार प्रतिक कोळी, सोमनाथ कोळी, गायक सोमनाथ कोळी, धीरज मढवी, भुमी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या लघु चित्रपटांत रविंद्र खर्डे, राजेश खर्डे, हेमंत सुतार, अरुण माने, वर्षा सावंत, धनश्री दळवी पाटील, विनोद पाटील, प्रियंका मुणगेकर, शाहीर काशिराम चिंचय यांची महत्वपूर्ण भूमिका असून आदिती खर्डे, अजय खर्डे, मंगला तायडे, धनाजी पवार, काशिनाथ गुरव, चंदनेश लडगे, प्रतिक कोळी, कविता जंगम, वेदिका जोशी, दिपक वेल्हाळ,, रवी साठी, इशाना चिंचय, आर्वी चिंचय यांच्या सहायक भूमिका आहेत
. या लघु चित्रपटाचे छायाचित्रण राजेश नडोणे, सोमनाथ कोळी, नरेश वेसावकर यांनी केले असून गीत प्रतिक कोळी, सोमनाथ कोळी यांची आहेत, संगीत आणि संकलन सोमनाथ कोळी, महेंद्र कोळी यानी केले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय पाटकर, इरफान कवचाली, प्रशांत काशिद सर, शाखाप्रमुख सतिष परब, रविंद्र खर्डे यांच्या हस्ते लघु चित्रपटातील सर्व कलावंत, तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच कार्यक्रमाचे सर्वेसर्वा अजय कौल सरांचे मनःपूर्वक आभार मानून वेसावची श्री हिंगलाई या लघु चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. या चित्रपटाचे निर्मिती प्रमुख राजेश खर्डे यांनी चित्रीकरण ते पोस्ट प्रोडक्शन तसेच रिलीज करेपर्यंत आडव्या येणारा प्रत्येक अडचणीतून माऊली मार्ग दाखवत होती हे सांगताना थकत नव्हते.
महेश तेटांबे, गणेश तळेकर आणि राहूल मौजे यांनी प्रसिद्धीची धुरा सांभाळली आहे. हिंगलायदेवीची स्थापना आणि माऊलीची महती सांगणारा हा लघुचित्रपट आवर्जून पाहावा असे आवाहन दिग्दर्शक आबा पेडणेकर तसेच निर्माते रविंद्र क्रुष्णा खर्डे यांनी केले.
महेश्वर तेटांबे
पत्रकार