श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे-मुंबई: जय हिंद अनाहूत पणाने का होईना मा. खासदार (संपादक) श्री संजय राऊत जी यांनी राजगुरूनगर तालुका (जिल्हा पुणे) येथील कायदा व सुव्यवस्था ही बिहार राज्यात आहे तशीच आहे हे मान्य केलंच !!
मा.खासदार श्री संजय राऊत जी पोलीस दलावरील राजकीय बेकायदेशीर हस्तक्षेप असल्याचे आपण मान्य करून महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध ठिकाणी अस्तित्वात असलेल्या प्रत्येक राजकीय पक्ष नेतृत्वाने त्या पोलीस ठाणे हद्दीतील आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्या त्या पोलीस ठाण्यातील पोलीस ठाणे प्रमुख, त्यांचे विश्वासातील पोलीस अंमलदार यांना खास त्याच बेकायदेशीर कामासाठी नेमलेले आहे हे सर्वश्रुत आहे. या राजकारण्यांच्या अस्तीवाच्या लढाईत कोणावर किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून किती दिवस कोणाला जेल मध्ये डांबून ठेवायचे, खोटे कागदपत्रे कशी तयार करायची ही सर्व कार्य प्रणाली मा. खासदार श्री राऊत जी कथन केलेली आहे.
श्री.संजय राऊत जी यांनी पोलीस दलातील व राजकारणी यांच्या मनमानी कारभार, बेकायदेशीर कार्यप्रणालीची कार्य पद्धत सांगितली ती नक्कीच बिहार राज्यातील आहे हे मान्य करावे लागेल इथं राजकीय व पोलीस जर बेकायदेशीर कृत्यात एकत्र आले तर काय होत असत याचे खेड तालुका उदाहरण आहे हे श्री राऊत जी यांचे मार्गदर्शन नक्कीच खरं विदारक सत्य उघड करणारे आहेच. आदरणीय हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन असलेला हा राजगुरूनगर (खेड) तालुका जिथं पुज्यनिय हुतात्म्यांनि भारत स्वतंत्र व्हावा या करता हसत हसत फासावर जाणं पसंत केलं त्या तालुक्यात आज कायदा व सुव्यवस्था याचे खुलेआम धिंडवडे निघत आहेत, गँग वॉर, खून, चोऱ्या, अवैध धंदे हे करणारे सर्वजण गुण्या गोविदाने हे सर्व कार्य बिनधास्त करत आहेत.
खेड तालुका सुजलाम सुफलाम करण्या करता दर पंच वार्षिक निवडणुकीत प्रत्येक पक्षांचे आदरणीय लोकप्रतिनिधी जितक्या भावनात्मक पद्धतीने प्रचार सभेत भावनिक साद घालून मत मागतात त्या सर्वांना याचा विचार परत पंच वार्षिक निवडणूक आल्यावरच होतो हे ही सत्य कोणी नाकारू शकत नाही. कमीत कमी बेकायदेशीर कृत्ये करणारांना तरी लोक प्रतिनिधींनी साथ देऊ नये आणि असे बेकायदेशीर आदेश मानणाऱ्या कायदा व सुव्यवस्था राखणे ज्यांचे मुख्य कायदेशीर कार्य आहे त्यांनी ही अशी बेकायदेशीर कृत्य केवळ राजकीय दबावाखाली करू नयेत.
श्री संजय राऊत जी यांनी केलेल्या आरोपात नक्कीच तथ्य असेल कारण त्यांच्या विचारातील ऐका मुद्द्यावर मात्र मन विचलित नक्कीच होत आहे की खेड तालुका बिहार झालाय अजून वेळ गेलेली नाही पारदर्शक प्रामाणिक राहून आदर्श वादी लोक प्रतिनिधी व शासकीय लोक सेवक म्हणून जर योग्य समाज कार्य केले देश सेवा केली तर या व्यवस्थेतील या सर्वांना एक मेकांवर चिखल फेक आरोप प्रत्यारोप व्यासपीठावरून बोलण्याची संधी उपलब्ध होणार नाहीत पक्ष व त्यांचे समर्थक नेते मंडळी आदरणीय मा मंत्री मा खासदार, मा आमदार यांना जनतेच्या समस्या त्यांच्यावर होणारा अन्याय, यावर चर्चा उपाय योजना, करण्याकरता सर्वसामान्य जनतेने या करताच निवडून दिलेलं आहे लोकप्रतिनिधी त्यांचे पक्ष शासन यांच्या कामाचा दर्जा व विश्वास पात्र नेतृत्व यालाच आम्ही सर्वजण साथ देत असतो.
मात्र अलीकडच्या काळात विविध राजकीय पक्ष व त्यांच्या तील अंतर्गत कलह इतके विकोपाला का गेलेत ? का अत्यंत खालच्या पातळीत जाऊन हे लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अब्रूची लक्तरे खुलेआम इलेट्रॉनिक प्रिंट माध्यमातून व्यक्त होताना करतात ?येणाऱ्या नवं पिढीने यातून काय बोध घ्यावा, कोणत्या आदर्श वादी लोकप्रतिनिधी याचा वारसा जपावा हे कोणी ठाम पणाने या घडीला सांगणार नाही. लोक प्रतिनिधी यांच्या बेकायदेशीर आदेशांचे पालन करता करताच परमवीर सिग, सचिन वाझे, प्रदिप शर्मा, रियाज काझी, शिंदे गँग उदयास आली आणि या सर्वांच्या अभद्र युतीचे गुन्हेगारी राजकारण महाराष्ट्र राज्य शासन यांच्या विधान भवन पवित्र मंदिरात जाऊन त्याची पवित्रता मलिन झाली हे ही कमीच आहे का ?.
असो श्री संजय राऊत जी यांनी जी विदारक सत्यता जनते समोर मांडली ती सत्य, असत्य हा येणार काळ नक्कीच ठरवेल परंतु राजकार व पोलीस दलातील चुकीच्या पद्धतीने होणारी कार्यपद्धती मात्र नक्कीच योग्य सांगितली आहे त्या करताच श्री संजय राऊत जी याना जय महाराष्ट्र मी कोणत्या ही राजकीय पक्षाचा हितचिंतक नाही किंवा प्रवक्ता नाही मी माझ्या 38 वर्षाच्या पोलीस सेवेतील अनुभवावरून हे माझं मत व्यक्त करत असून प्रामाणिक व इमानदार पोलीस यांना त्यांच्या या कार्या पासून लांब राहवून लोकप्रतिनिधी च्या बेकायदेशीर आदेशांचे पालन करावे लागते जे करत नाहीत त्याचा सुनील टोके व जे बेकायदेशीर आदेश मनातील ते अमाप संपत्ती कमावून मस्त व सतत त्याच कामात व्यस्त कारण राजकीय वरदहस्त हा ब्रह्म देवा चा आशीर्वादाने प्रेरित आहे. जय हिंद !!
श्री सुनिल टाेके याच्या मताशी श्री जगदीश काशीकर सहमत आहेत कारण तेही अशा अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत !! काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुर्घटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेळ आली आहे !!