…कुठे लपला तथा कथित जाणता राजा…
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, यांच्या काळात शेतकर्यांचे शेती पंपाची वीज कनेक्शन एकदाही तोडू दिले नाही. व शेतकऱ्यांना लाईट बिल भरा म्हणून दबाव आणला नाही. असे शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व शेतकऱ्यांचा कैवारी व त्यांचे हाल समजून घेणारा, शेतकऱ्यांचा वाली वाली, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
परंतु आता या "तीन तिघाड काम बिघाड" या सरकारमध्ये किंग मेकर व तथाकथित जाणता राजा म्हणवणारे नेते, आता शेतकर्या वरती उपासमारीची वेळ आली आहे. पीक जोमात आले आहेत परंतु लाईट नसल्याने पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी जनावरांसाठी लागणारे पाणी शेंदून काढायला लागत आहे.
आज आपण एकविसाव्या शतकात असून देखील शेतकऱ्यांना इ स वी सन सतराव्या शतकात असणाऱ्या पणजोबा खापर पणजोबा त्यांचे आजोबा पणजोबा यांच्या पिढ्या आठवायला लागले आहेत. एवढी वाईट महाराष्ट्रातील शेतकरी बांधवा वरती वेळ आलेली आहे.
आणि अशा परिस्थितीत स्वतःला तथाकथित जाणता राजा समजणारा नेता आता कुठे लपून बसला आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय द्या लवकरात लवकर शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज कनेक्शन जोडून द्यावेत अन्यथा बिळात लपून बसलेल्या तथा कथित जाणता राजाला बिळातून बाहेर कधीच येऊ दिले जाणार नाही.