नरवणे ता. माण येथील रस्त्याची दुरवस्था
नरवणे
नरवणे तालुका माण येथे मुख्य रस्त्यावर गावाच्या प्रवेशद्वारापाशी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत अशातच हा रस्ता आहे की ओढा असा प्रश्न वाहनचालकांना पडताना दिसतो.रस्त्यावर खूप मोठे खड्डे त्यामध्ये गढूळ पाणी साचलेले कायम पाहण्यास मिळते.यामुळे वाहन चालकांना किंवा गावकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
दहिवडी कुकुडवाड या रस्त्यावर नरवणे नजीक प्रवेशद्वारापाशी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे.याबद्दल संबंधितांनी त्वरित लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.अजून परतीच्या पावसाचे दिवस पुढे आहेत या भागांमध्ये परतीचा मान्सून हा जास्त सक्रिय होत असतो.सध्या एवढ्या पावसावरच रस्त्याची ही अवस्था आहे तर खूप मोठे सलग पाऊस झाल्यावर संपर्क तुटण्याची शक्यता आहे.रस्त्याची देखभाल संबंधित विभागाकडून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
##रस्त्याची दुरावस्था ही गोष्ट दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही.याबद्दल आम्ही संबंधित विभागाला निवेदन देऊन विनंती करणार आहोत.
सरपंच- दत्तात्रय महादेव काटकर.##