बुध्दाचा धम्म म्हणजे—”बहुजन हिताय बहुजन सुखाय” वर्षावासात आत्मचिंतन करून पुढे जाऊयात
——————————————
बुध्द धम्मात “वर्षावासाला”खुपच महत्व आहे.प्रत्येकजन आपआपल्या नियोजनाप्रमाणे वर्षावास साजरा करत असतो.या.काळात आपण मैञीभाव वाढवत कटुता संपवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.मनातील राग,लोभ मत्सर द्वेश काढून टाकले पाहिजे व धम्माचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.यासाठी आपल्या भिक्खुंनी,बौध्दाचार्य व उपासकांनी पोटजाती मोडल्या पाहिजेत व दैववाद नष्ट केला पाहिजे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा बौध्द भिक्खुवर फार मोठा विश्वास होता .म्हणूनच आजही आपला भिक्खुवरती तेवढाच विश्वास आहे.बाबासाहेबांनी, एकदा स्पष्ट केले होते…’बौध्द भिक्खुंचे प्रशिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे!”
आज या विचाराची गरज वाटायला लागली आहे. गाव, खेड्यातल्या ,शहर वस्तीतल्या समाजाला, समाज घटकाला बौद्ध तत्वज्ञानात बसविण्याची, त्याला सज्ञान करण्याची जबाबदारी भिक्खु संघावर होती. बुद्धाच्या भिक्खु संघात 75 टक्के ब्राह्मण व 25 टक्के इतर जातीतील भिक्खु होते. बुद्धाच्या 40 मित्रांनी बुद्ध धम्म स्वीकारला व पुढे त्यांनीच धम्माचा प्रचार व प्रसार केला. त्यातील यश हा भिक्खु श्रीमंत व विद्वान होता.एकेदिवशी बुद्धाने यशला विचारले…!” यश,हा धम्म कसा आहे?” त्यावर यश म्हणाले,” बहुजन हिताय बहुजन सुखाय !”हा धम्म लोकांचे कल्याण करणारा आहे असे म्हणाले .आज आडाणीच काय? पण शिकलेल्या लोकांवरही दैववादाचा पगडा आहे
.तो बौध्द भिक्खुंनीच काढला पाहिजे. समाजाला सत्य सांगण्याचे व त्यांना विज्ञाननिष्ठ करण्याचे काम भिक्खुंनीच करणे गरजेचे आहे. 1956 नंतरच्या धम्मक्रांती नंतर हे काम जेवढे जोमाने झाले पाहिजे होते तेवढे झाले नाही.जे झाले ते योग्यच आहे परंतु ते अपुरे आहे.आज परिस्थिती बदलती आहे. यासाठी आज भिक्खुंची संख्या वाढली पाहिजे! म्हणताना आपण भिक्खु संघाला तरूण देतो का ?हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज आपला धम्म वाढवायचा असेल तर आपण भिक्खुंची संख्या वाढवली पाहिजे आणि भिक्खुंनी पोटजाती मोडल्या पाहिजेत. व समाजातील दैववाद नष्ट केला पाहिजे!
वर्षावासात आपण आत्मचिंतन करूयात व एकमेकांना साथ देऊयात.
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
⛩⛩⛩⛩⛩⛩⛩⛩