वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने केली पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पहाणी
केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून पूरग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी
सांगली ;
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा शिष्टमंडळाने पलूस तालुक्यातील पुराग्रस्त गावांना भेट देत झालेल्या नुकसानाची पाहणी* केली.
राजेश गायगवाळे म्हणाले कि 2019 च्या महापुराच्या जखमा ताज्या असताना व कोरोनाच्या प्रसंगाला तोंड देत असताना आता या भागात पुन्हा पुराने थैमान घातले असून लोकांच्या घरांचे, शेतीचे, पिकांचे व संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून राज्य व केंद्र शासनाने आपापसात समन्व्यय साधून या परिस्थितीवर राजकारण न करता पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी.
वारंवार येणाऱ्या पुराच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने तात्काळ पुराचे पाणी नागरी वस्तीत न येण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणचे पुनर्वसन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे गायगवाळे यांनी सांगितले.
वंचितच्या शिष्टमंडळाने वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, माळवाडी, भिलवडी याठिकाणी भेटी देत पुरग्रस्त नागरिकांची विचारपूस करत नुकसानाची पाहणी केली, यावेळी वंचितचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित बनसोडे, जिल्हा सदस्य विनीत कांबळे, मुरलीधर बनसोडे, अमोल गायगवाळे, प्रशांत कोळी, अजिंक्य बोडरे यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.