.
ओ बी सी,आणि भटके विमुक्त बांधवां नी न्याय हक्कासाठी एकत्र यावे प्रा.लक्ष्मण हाके.
आज म्हसवड येथे माणदेश दौरया वर आले असता राज्य मागासवर्गीय आयोगा चे सदस्य प्रा.लक्ष्मण हाके यांनी भेट दिली ,न्याय हक्का साठी ओ बी सी आणि भटके विमुक्त यांची एकजूट,जागृती अतिशय महत्वाची असुन जाती संघटना मधे न अडकता या समुदायाने आपला संविधानिक आधिकार प्राप्त करणेसाठी एकत्र आले पाहिजे,सातारा जिल्हा आणि माण देश हे भटके विमुक्त ओ बी सी चळवळी चे केंद्र आहे आणि येथे झालेल्या सत्कारा साठी मी माणदेशी माणसा चा आभारी आहे असे वक्तव्य त्यांनी केले.
या वेळी बहुजन नेते सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ प्रमोद गावडे,नगरसेवक दिपक बनगर,एल के सरतापे,सोमनाथ कबीर,मूसाभाई शेख,तानाजी विरकर.निलेश जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.