वनश्री पुरस्काराच्या प्रथम क्रमांकाचा मान फलटणच्या मुधोजी महाविद्यालयास
दहिवडी :
मुधोजी महाविद्यालयाने आजपर्यंत वृक्ष संवर्धनाच्याबाबतीत केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने देखील घेतली. परिणामस्वरूप महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार फलटणच्या मुधोजी महाविद्यालयास प्रदान करण्यात आला.
एकूण ७७गुणांची कमाई करत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्यावतीने हा पुरस्कार डॉ.सुधीर इंगळे यांनी स्वीकारला.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना माजी समन्वयक, मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.प्रा. सुधीर इंगळे( बापू), सदस्य गव्हर्निंग कौसलिंग ,डॉ राजवैद्य ,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा.पंढरीनाथ कदम, दिलीप कुमरे,इत्यादी उपस्थित होते.
यावेळी डॉ.सुधीर इंगळे यांनी पुरस्कार दिल्याबद्दल शासनाचे आभार मानून भविष्यात फलटण तालुका व परिसरात वृक्षरोपन मोहीमेचा आराखडा व उपक्रमांचा तपशील सादर केला. याबद्दल कोल्हापूर जिल्हा अधिकारी, रणजीत पाटील व सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व पुणे विभागाचे वन संचालक हनुमंत धुमाळ यांनी डॉ.सुधीर इंगळे यांचे अभिनंदन केले .
हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे मुधोजी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याने विद्यार्थी वर्गाने एकच जल्लोष केला. यासोबतच राष्ट्रीय सेवा योजनेच्या आजी माजी स्वयंसेवकांनी डॉ. सुधीर इंगळे यांचे अभिनंदन केले.